मुंबई बातम्या

CORONA | पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, नेमका ‘मुंबई पॅटर्न’ काय? – TV9 Marathi

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. (Mumbai pattern for Pune Covid Control said health minister Rajesh Tope)

कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घ्यावेत. तसेच त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्याांनी कार्यालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटिलेटर बेडस, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

पुणे शहरात 14 हजार 780 इतके कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 572 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरात 5 हजार 575 इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण 8 हजार 633 जणांना घरी सोडण्यात आलं आहे.

तर पुणे जिल्ह्यात एकूण 19 हजार 238 कोरोना रुग्ण असून 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईनंतर पुण्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबई पॅटर्नचा नक्की प्रभाव पडले, असं वैद्यकीय तज्ञांच मत आहे.

स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करावे. त्यासोबतच लोकांच्या मनात कोरोना विषाणूची भीती कमी करण्यासाठी सोशल मीडिया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडिओ यांचा वापर करून जनजागृती करावी.

आज लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले आहेत. अशा व्यक्तींच्या अनुभवातून यशकथा तयार कराव्यात. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती जास्तीत जास्त चाचणीद्वारे मिळणार आहे. त्यामुळे नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूवर मात करण्याचा हा मुबंई पॅटर्न आहे. पुण्यात या पॅटर्नची अंमलबजावणी कशी केली जाते, त्याचे काय परिणाम होतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. (Mumbai pattern for Pune Covid Control said health minister Rajesh Tope)

संबंधित बातम्या : 

Pune Corona : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेत सर्वसामान्यांना प्रवेशबंदी

कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/pune/mumbai-pattern-implemented-for-pune-city-district-covid-control-said-health-minister-rajesh-tope-235986.html