मुंबई : राज्यातील लोकसंख्येने गजबजलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमधून भविष्यात गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी मुंबई, पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचे नसून, मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुंबई बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचेही प्रकल्प उभारण्याची गरज आहे. सध्या मुंबईत कोरोना विणाणूचे संकट गंभीर बनले आहे. हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणे आवश्यक आहे. असेही गडकरी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून कोरोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल. तसेच समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचे प्रमाणही कमी झाले पाहिजे. जेणेकरून पर्यटनासाठीही लोक येतील, असेही ते म्हणाले. भविष्यात पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहने चालवण्यात यावीत, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:
Mumbai, Pune Crowds need to be reduced say Nitin Gadkari
Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-pune-crowds-need-be-reduced-say-nitin-gadkari-313497