मुंबई बातम्या

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू – Loksatta

-विजय राऊत 

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे भीषण कार अपघात झाला असून, यामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मुंबईहुन सुरतकडे जाणारी कार दुभाजकला धडकून विरुद्ध रस्त्यावर गेल्याने हा भीषण अपघात घडला. तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर दापचरी हद्दीत रबर बोर्डाजवळ संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या व्हॅगनार (एम एच 02 डी जी 3162) कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या  मार्गावर उलटून पडल्याने हा भीषण अपघात झाला. गाडी दोन तीन वेळा उलटल्याने  पूर्ण चेंदामेंदा झाली होती. परिणामी गाडीमध्ये बसलेल्या चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाच उपचारादरम्यान एकाचा मृत्यु झाला.

या अपघातामध्ये 50 ते 55 वर्षे वयोगटातील दोन पुरुष, 30 ते 35 वर्षे वयोगटातील दोन महिला आणि 10 ते 12 वर्षाचा एक मुलगा असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.   अपघातातील सर्व मृत हे नालासोपारा येथील आहेत.
1. देवीप्रसाद शुक्ला (वय- 46), रेईना देवीप्रसाद शुक्ला (वय- 42),  श्रुती देवीप्रसाद शुक्ला (वय- 16),  स्वयम देवीप्रसाद शुक्ला (वय- 10), संजय कुमार तिवारी , कल्याण (वय – 30) अशी त्यांची नाव असून, हे अपघातामधील मृत नालासोपारा A 302 मॅक्सवेल एव्हेन्यू ओसवाल नगरी, सेंट्रल पार्क येथील आहेत.

हे सर्व मुंबई नालासोपाराच्या दिशेने नवसारी येथे एक कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होते. दापचेरी येथे त्यांच्या गाडीचा टायर फुटले आणि गाडी  दुभाजकाला आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्यात समोर भरधाव येणारया ट्रकची धडक बसल्याने यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 26, 2020 8:39 pm

Web Title: five killed in mumbai ahmedabad national highway accident msr 87

Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/five-killed-in-mumbai-ahmedabad-national-highway-accident-msr-87-2198582/