मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमन (वय-54) याचा मृत्यू झाला आहे.
- Share this:
नाशिक, 26 जून: मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमन (वय-54) याचा मृत्यू झाला आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहात सकाळी युसूफ मेमन याला हृदयविकाराचा झटका आहे. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युसूफचं शव विच्छेदन धुळे शासकीय महाविद्यालयात होणार आहे.
हेही वाचा…धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या
टायगर मेमन हा 1993 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. गेल्या 2 वर्षांपासून युसूफ आणि इसाक हे त्याचे भाऊ नाशिक कारागृहात भोगत आहे. दोघे आधी मुंबईत आर्थर रोड कारागृहात होते. युसूफला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण आजारपणामुळे युसूफला काही काळासाठी जेलबाहेर ठेवण्यात आलं होतं. आजारपणामुळे युसूफला जामिन मिळाला होता, पण या काळात युसूफ रुग्णालयातच राहिल, अशी अट ठेवण्यात आली होती. दरम्यान, मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला याआधीच फाशी झाली आहे. तर मुंबई बॉम्बस्फोटाचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अजूनही फरार आहेत.
12 साखळी बॉम्ब स्फोटांनी हादरली होती मुंबई…
12 मार्च 1993 मध्ये एकूण 12 ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली होती. या बॉम्ब स्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 713 जखमी झाले होते.
स्टॉक एक्चेंज, नरसी नाथ स्ट्रीट, शिवसेना भवन, सेच्युरी बाजार, माहीम, झवेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाजा सिनेमा, जूहू सेंट्रल हॉल, विमानतळ आणि एअरपोर्ट सेंट्रल हॉटेल परिसरात एकापाठोपाठ बॉम्बस्फोट झाले होते. अवघ्या 2 तासांत एकूण 12 स्फोट झाले होते.
हेही वाचा…आता घरबसल्या मोफत करा चेकअप, ई-संजीवनी ओपीडीचे मोबाईल ॲप लॉन्च
मुंबई पोलीसांनी या आरोप प्रकरणात 4 नोव्हेंबर 1993 मध्ये 10000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात 189 जणांना आरोपी करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले होते.
First Published: Jun 26, 2020 03:56 PM IST
Source: https://lokmat.news18.com/maharashtra/accused-of-1993-mumbai-bomb-blasts-yusuf-memon-dies-in-nashik-jail-update-mhsp-460947.html