मुंबई बातम्या

जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांकडून एक भन्नाट फोटो शेअर… – Sakal

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. अशातच कोरोना व्हायरसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मुंबई पोलिस नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट सक्रियपणे पोस्ट शेअर करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आणखी एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही चित्रपटांमधील कल्पना घेऊन पोस्ट शेअर केल्यानं नेटीझन्स पोलिस खात्याचं कौतुक करताहेत.

देशातील रेल्वेची नियमित वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद? सोशल मीडियावर जोरदार चर्चा…

आपण परीकथांचे चाहते असाल तर, स्नो व्हाइट आणि सेव्हन ड्वार्फ्स या प्रसिद्ध डिस्ने चित्रपटातील,  Mirror, Mirror on the wall, who is the….?” ही लाईन तुम्ही नक्की ऐकल असाल. मुंबई पोलिसांनी त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये या लाईनच्या आधारे फोटो शेअर करुन असाच प्रश्न विचारला आहे. 

पोलिस विभागाने या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जादूई आरशात मास्क घातलेल्या राजकुमारी स्नो व्हाइटचे प्रतिबिंब दिसत आहे. पोलिसांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिलं की, भिंतीवरील आरसा-आरसा, या सर्वांमध्ये सर्वात सुरक्षित कोण आहे? ” (Mirror-Mirror on the wall, Who is the safest of them all?) 

मुंबईच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तसंच या पोस्टसोबत पोलिसांनी हॅगटॅगचाही वापर केला आहे. #SnowWhiteAndHerSevenMasks असा हॅगटॅगही वापरण्यात आला आहे.  गुरुवारी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. या पोस्टवर नेटीझन्सनी पोलिस विभागाच्या सर्जनशीलतेचे कौतुक केलं आहे. 

पोलिसांचं उरी स्टाइल ट्विट 

याआधीही पोलिसांनी उरी स्टाइल ट्विट केलं होतं. ा ट्विटमध्ये पोलिसांनी उरी: द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमातील एका डायलॉगचा वापर केला आहे. 

अभिनेता विकी कौशलचा उरी: द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमानं लोकांमध्ये बरीच क्रेझ निर्माण केली होती. या सिनेमातील हाऊज द जोश हा डायलॉग बराच प्रसिद्ध झाला होता. हाच संदर्भ घेऊन मुंबई पोलिसांनीही ट्विट केलं आहे. 

या डायलॉगचा आधार घेत, त्यात थोडासा ट्विस्ट करुन मुंबई पोलिसांनी नागरिकांना ‘हाऊज द डिस्टन्स?’ अशी विचारणा केली आहे. पोलिसांनी विकी कौशलचा फोटो शेअर करत ‘हाऊज द डिस्टन्स’ असं कॅप्शन दिलं आहे. 

पण पोलिसांना विकी कौशलचा हा फोटो एडिट केला आहे. या फोटोत त्याच्या तोंडाला मास्क लावण्यात आला आहे आणि त्यात ‘सहा फिट सर’ असं फोटोखाली लिहिण्यात आलं आहे. बॉलिवूड सिनेमातील या प्रसिद्ध डायलॉगचा उत्तमरित्या वापर करुन मुंबई पोलिसांनी चांगली जनजागृती केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी सहा फूट अंतराचं नियम पाळायला विसरु नका असा संदेश दिला आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/police-shares-photo-princess-snow-white-wearing-mask-asks-whos-safest-312868