मुंबई बातम्या

आयआयटी बॉम्बेचे आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे; शैक्षणिक सत्र ऑनलाइन घेण्याचा निर्णय – Sakal

नवी दिल्ली, ता.२५ (पीटीआय)- देशभरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी- बॉम्बे या प्रतिष्ठित संस्थेने पुढील शैक्षणिक सत्र हे पूर्णपणे ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशातील अन्य तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थादेखील हा कित्ता गिरवू शकतात. पूर्णपणे ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारणारी आयआयटी मुंबई ही देशातील पहिलीच संस्था ठरली आहे. 

मोठी बातमी! भारतीय अवकाश क्षेत्र  खासगी कंपन्यांसाठी खुले 
या शैक्षणिक संस्थेच्या ६२ वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होत असताना प्रत्यक्ष कॅम्पसमध्ये मात्र एक विद्यार्थी दिसणार नाही. आता देशातील अन्य आयआयटींकडून अशाच प्रकारची घोषणा अपेक्षित आहे. त्यामुळे जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागेल. या निर्णयाबाबत आयआयटी बॉम्बेचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी सांगितले की, ‘‘संस्थेच्या सिनेटमध्ये या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली, या चर्चेअंतीच आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुढील शैक्षणिक सत्र पूर्णपणे ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे आम्हाला अध्यापनाचा नवा मार्ग गवसला आहे.’’ 

Big Breaking : CBSE आणि ICSE ने दहावी-बारावीच्या परीक्षा केल्या रद्द,…
मदतीचे आवाहन 
शैक्षणिक सत्राला विलंब होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाइन क्लासेसचा मार्ग निवडला असून, लवकरच या संदर्भातील माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात येईल. आमच्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील असल्याने त्यांच्या मदतीसाठी समाजातील दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहनही चौधरी यांनी केले आहे. 

WHO ने कोरोनाबाबत दिला आणखी एक इशारा; सांगितले…
आयआयटी दिल्ली त्याच मार्गावर 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाला निशंक हे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दिनदर्शिकेत बदल करण्याच्या विचारात असतानाच आयआयटी बॉम्बेने ही घोषणा केली आहे. आयआयटी दिल्लीदेखील ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे, कोरोना कधी संपुष्टात येईल, हे आताच सांगणे कठीण असल्याने ऑनलाइन शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्यासमोर नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source: https://www.esakal.com/desh/iit-bombay-shift-online-education-next-semister-312506