मुंबई बातम्या

मुंबई अनलॉक होतेय तरीही; लालबाग मार्केट पाच दिवस बंद! वाचा कारण – Sakal

मुंबई- कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबई शहरात झालेला दिसतोय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबई अद्यापही काही ठिकाणी कडक निर्बंध आहेत. तरीही सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजताना दिसताहेत. मुंबईतील काही भाजी मार्केट सुरु करण्यात आलेत. अशातच भाजी आणि किराणासाठी लालबागचे मार्केटही प्रसिद्ध आहे. पण आता हे मार्केट पुढचे पाच दिवस बंद राहणार आहे. 

महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती…

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी परळमधील लालबाग मार्केट पुढील पाच दिवस बंद राहील. 15 जूनला मार्केट पुन्हा सुरु झाल्यानंतर दोन दिवसांतच सात जणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर मार्केट बंद करण्याचा निर्णय बाजार अधिकाऱ्यांनी घेतला. 

दिनशॉ पेटिट रोड, जो ‘चिवडा गल्ली’म्हणून ओळखलो जातो. चिवडा गल्ली एक छोटीशी गल्ली आहे जिथे चिवडा दुकानांसह अनेक दुकांनाचा समावेश आहे. चिवडा गल्ली हा देखील लालबाग मार्केटचा एक भाग आहे आणि तो देखील बंद राहणार आहे. 

एफ साऊथ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नाजा क्षीरसागर यांच्याशी लालबाग व्यापरी अँड मार्केट असोसिएशननं संपर्क साधला आणि त्यांना नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाविषयी माहिती दिली. त्यानंतर बाजार पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं स्वप्नाजा क्षीरसागर यांनी सांगितलं. 

कोरोनात आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वापरला जातोय ‘हा’ महत्त्वाचा पर्याय…

या भागात नव्यानं सात जणांना कोरोनाची लागण झाली. 15 जूनला मार्केट सुरु झाल्यानंतर बाजारपेठ आणि दुकाने पर्यायी दिवसांवर सुरु झाले होते. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांनी [असोसिएशन] स्वच्छेनं मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं, क्षीरसागर यांनी म्हटलं. 

क्षीरसागर यांनी रहिवाशांना घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: आता पावसाळा असल्यानं पावसाशी संबंधित आजारही डोकं वर काढतात. अशातच नागरिकांनी घरीच राहावं. 

संघटनेचे अध्यक्ष संकेत खामकर यांनी म्हटलं की, एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागातील कमीत कमी 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच येथे पुन्हा आणखी सात रुग्ण आढळून आले. 

खामकर म्हणाले की, हे सातही रुग्ण लालबागचा राजा सोसायटीमधील स्थानिक रहिवासी आहेत.

मुंबई परिसरातील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांचे स्वॅब (swabs) घेण्यात आले. थर्मल स्क्रिनिंगनंतर या प्रकरणांची स्पष्टता झाली. अनलॉक झाल्यानंतर आमच्याकडे अचानक सात नवीन प्रकरणे समोर आली. आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाच्या हिताच्या दृष्टीने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

अत्यावश्यक वस्तू, किराणा सामान, मसाले आणि स्नॅक्स पुरविणारी लालबाग मार्केट ही मुंबईतील सर्वात जुनं मार्केट आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/even-though-mumbai-unlocked-lalbagh-market-closed-five-days-read-reason-312288