मुंबई बातम्या

मास्कची जनजागृती करण्यासाठी वडा पाव, खिमा पाव, भुर्जी पाव; मुंबई पोलसांचे ट्विट पुन्हा चर्चेत – Sakal

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६६ हजारांच्या पार पोहोचली आहे. कित्येक जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. पण या महामारीच्या काळातही मुंबई पोलिस योद्ध्याप्रमाणे आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. लोकांना घरी राहण्याचं आवाहन करत आहेत त्याचबरोबर वेळोवेळी मास्क लावण्याचं ही आवाहन करत आहेत. मात्र काही लोकं अजूनही मास्क न लावताच घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नेहमीप्रमाणेच हटके स्टाईलमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 

मुंबई पोलिस नेहमीच वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृती करत असतात. यावेळी कोरोना महामारीच्या संकटापासून बचाव करायचा असेल तर मास्क लावणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी थेट वडा पाव, भुर्जी पाव, खिमा पाव या खाद्यपदार्थांचा वापर केला आहे. या संबंधीचा फोटो मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. 

हेही वाचा: कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या ‘फॅबि-फ्लू’ या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती…

काय आहे या ट्विटमध्ये: 

वडा पाव, खिमा पाव, भुर्जी पाव हे मुंबईकरांचे आवडते पदार्थ आहेत. ज्याप्रमाणे या सर्व पदार्थांमध्ये ‘पाव’ महत्वाचा आहे त्याचप्रमाणे बाहेर जाताना ‘मास्क’ वापरणं महत्वाचं आहे असं मुंबई पोलिसांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

“मास्क हा आता आपल्या चेहऱ्याचे एक आभूषण नव्हे तर एक अवयव बनून नेहमी आपल्यासोबत राहून कोरोनापासून आपलं रक्षण करतो. काही आरोग्यदायी गोष्टींना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. घरीच राहा, सुरक्षित राहा,” असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. 

 

 

हेही वाचा: धक्कादायक! मुंबईत क्वांरटाईन सेंटरमध्ये मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न

मुंबईत सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र मुंबई पोलिस आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.        

mumbai police telling importance of mask by example of wada paav 

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-police-telling-importance-mask-example-wada-paav-311010