मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावरून आजपासून १०० फेऱ्या – Loksatta

देशांतर्गत विमान फेऱ्यांना वाढता प्रतिसाद पाहता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण व आगमन फेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. १६ जूनपासून या विमानतळावरून १०० फेऱ्या हाताळण्यात येतील. ५० फेऱ्यांचे उड्डाण व ५० फेऱ्यांचे आगमन होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. देशांतर्गत विमान फेऱ्यांना २५ मे पासून सुरुवात झाली. २५ फेऱ्यांचे उड्डाण व २५ फे ऱ्यांच्या आगमनाची परवानगी राज्य शासन व विमानतळ प्रशासनाने दिली होती. २५ मे रोजी एकूण ४७ फेऱ्यांमधून ३,७५२ प्रवाशांनी प्रवास केला होता. सात दिवसांत ४२ हजार प्रवाशांनी येजा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 16, 2020 12:36 am

Web Title: 100 round trips from mumbai airport from today abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/100-round-trips-from-mumbai-airport-from-today-abn-97-2188477/