मुंबई बातम्या

Navi Mumbai Corona Update | नवी मुंबईत सर्वाधिक 191 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 3 हजार 734 वर – TV9 Marathi

नवी मुंबई : नवी मुंबईत आज (13 जून) 191 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा नवी मुंबईतील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबईत दररोज 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (Navi Mumbai latest Corona Update)

नवी मुंबईत आज नवे 191 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 734 पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे आज 5 कोरोनाबळी गेले आहेत. नवी मुंबईकरांसाठी ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. काही तासांपूर्वी नवी मुंबईतील एका रुग्णालयातून रुग्ण पळून गेल्याचे वृत्त पसरल्यामुळे प्रशासनावर कारवाईचा बडगा उगारला जाईल का असा प्रश्न उद्भवत आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना रुग्णांचा आकडा प्रसिद्ध करताना बरे झालेल्या रुग्णांचा आकडा प्रसिद्ध केला जातो. मात्र सततच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पालिकाचा हा दावा फोल ठरला आहे, हे दिसून येते.

नवी मुंबईत कुठे किती रुग्ण? 

  • बेलापूर – 17
  • नेरुळ 41
  • वाशी 11
  • तुर्भे 24
  • कोपरखैरणे 21
  • घणसोली 18
  • ऐरोली 46
  • दिघा 13

तर आज एका दिवसात 62 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात बेलापूर 3, नेरुळ 13, वाशी 2, तुर्भे 13, कोपरखैरणे 5, घणसोली 7, ऐरोली 14, दिघा 5 असे एकूण 62 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 186 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत सध्या 1 हजार 434 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Navi Mumbai latest Corona Update)

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात, नवी किंमत किती?

मिशन बिगीन अगेननंतर महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, अवघ्या 6 दिवसात तब्बल 18 हजार 500 रुग्ण

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/navi-mumbai-latest-corona-update-new-191-corona-patient-found-in-navi-mumbai-230684.html