मुंबई बातम्या

Mumbai biggest Coronavirus hotspot Andheri east and Jogeshwari | धारावी नव्हे तर हा परिसर झालाय मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट – Zee २४ तास

मुंबई: धारावीनंतर आता मुंबई शहरात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट तयार झाल्याचे शनिवारी निदर्शनास आले. धारावी, दादर , माहिमच्या जी उत्तर विभागाला मागे टाकत अंधेरी पूर्व-जोगेश्वरीचा के पूर्व विभाग कोरोना रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर आला आहे. धारावी, माहीम आणि दादर परिसरात शनिवारी अनुक्रमे १७, १३ आणि १९ रुग्ण आढळले. तर के पूर्व विभागात शनिवारी कोरोनाचे १६६ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे हा परिसर आता मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे आता के पूर्व विभागातील आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर आहे. आगामी काळात रुग्णांची वाढती संख्या महापालिकेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मुंबईतील ९४ टक्के व्हेंटिलेटर्स, ९९ टक्के ICU बेडस् वापरात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. त्यामुळे ‘पीक’च्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास नव्या रुग्णांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

*के पूर्व विभागात मुंबईतील सर्वाधिक ३७८२ रुग्ण*

*एका दिवसात के पूर्व मध्ये १६६ रुग्णांची वाढ

कालपर्यंत धारावी-दादर-माहिमचा समावेश असलेला मुंबईतील मोठा हॉटस्पॉट जी उत्तर विभाग रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर होता. मात्र, आता हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर गेलाय.

मुंबईचा कोरोना डबलिंग रेट २६ दिवसांवर

*मुंबईतील ६ विभागांत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या
१. के पूर्व– अंधेरी -जोगेश्वरी– ३७८२

२. जी उत्तर – धारावी, माहिम, दादर- 3729

३. एल विभाग- कुर्ला- 3373

४. ई विभाग- भायखळा, मुंबई सेंट्रल- 3144

५.के पश्चिम- अंधेरी पश्चिम–3138

६. एफ उत्तर- माटुंगा, वडाळा– ३१११

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-biggest-coronavirus-hotspot-andheri-east-and-jogeshwari/523786