मुंबई बातम्या

धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन… – Sakal

मुंबई: संपूर्ण मुंबई सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांचं निधन झालं आहे. पोलिस, आरोग्य कर्मचारी त्याचसोबत नेते मंडळी देखील कोरणाच्या लागणी पासून बचावले नाहीत. त्यात आता एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबई महापालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचं कोरोनानं निधन झालंय. 

 हेही वाचा: गलथान कारभार ! कुठे कोरोना रुग्ण गायब, कुठे कोरोना रुग्णाचा मृतदेह गहाळ, यावर महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

मुंबई महापालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याचं कोरोनानं निधन होणं ही चिंतेची बाब आहे. शिरीष दीक्षित हे मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात डीएसपी म्हणून कार्यरत होते. पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण जबाबदारी शिरीष दीक्षित यांच्यवर होती. मात्र आज त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

काही दिवसांपूर्वी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. त्यांना कोरोनाची कोणती लक्षणं होती याबाबत अजूनही काही माहिती मिळू शकली नाहीये. कालपर्यंत ते नियमितपणे कामावर येत होते  मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळतेय.

हेही वाचा: मुंबईकरांनो लोकल सुरू झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; ही अधिकृत माहिती वाचा

आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या तब्बल ५५ कर्मचाऱ्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. त्यात आता एका मोठ्या पदावरच्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू होणं ही महापालिकेसाठी चिंतेची बाब आहे.   

horrible news bmc deputy commissioner died due to corona in mumbai 

Source: https://www.esakal.com/mumbai/horrible-news-bmc-deputy-commissioner-died-due-corona-mumbai-304874