मुंबई बातम्या

पाहा, मुंबई आणि परिसरात सकाळी कसा पाऊस कोसळला ? – Zee २४ तास

मुंबई : शहर आणि मुंबई उपनगरात सकाळी जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसाने मुंबईत सकल भागात पाणी साचले होते. नवी मुंबईत पहाटे पाऊस कोसळत होता. तर अंबरनाथ ग्रामीण आणि कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटे पासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

चक्रीवादळाच्या विश्रांतीनंतर एक दिवस पाऊस झाला. त्यानंतर पहाटेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. मुंबईकरांना मुसळधार पावसाच्या सरी अनुभवयाला मिळत आहेत. आज सकाळपासूनच मुंबईवर ढगांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. पवई, घाटकोपर, वांद्रे, चेंबूर, लालबाग, सायन, दादर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी येथेही चांगला पाऊस झाला.

दक्षिण मुंबई

जोरदार पाऊस

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/morning-rain-in-mumbai/522899