मुंबई बातम्या

Cyclone Nisarga | मुंबई, पुण्यासह, कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज पुरवठा खंडित – TV9 Marathi

मुंबई : कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट ओढावले (Cyclone Nisarga Mumbai Rain) आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.

मुंबईत काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाचा जोर अद्याप कायम आहे. मुंबईत गेल्या 12 तासात 20 ते 40 मिलीमीटर इतका पाऊस झाला. मुंबईतील कुलाबा, दादर, जुहू आणि मरिन ड्राईव्ह या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समु्द्राजवळील किनारपट्टीच्या भागांमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

सातारा शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर

03/06/2020,11:22AM

निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्गातून पुढे सरकले, पावसाचा वेग मंदावला

03/06/2020,10:40AM

मुंबई पालिकेकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना

03/06/2020,10:24AM

रत्नागिरीला वादळी वाऱ्याचा वेग वाढला

03/06/2020,10:22AM

रत्नागिरीत वाऱ्याने चांगलाच वेग पकडला

03/06/2020,10:04AM

जालन्यात निसर्ग चक्रीवादळचा परिणाम

03/06/2020,10:02AM

निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबईकरांसाठी पालिकेच्या सूचना

03/06/2020,9:09AM

निसर्ग चक्रीवादळाचे संपूर्ण मराठवाड्यावर परिणाम

03/06/2020,8:59AM

कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा प्रभाव

03/06/2020,8:35AM

तटरक्षक दलाकड़ून 109 मच्छिमारांची सुटका

03/06/2020,8:16AM

चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

03/06/2020,8:17AM

वसई विरार, नवी मुंबईत रिमझिम पाऊस

वसई विरार क्षेत्रात चक्रीवादळाचे संकट आहे. प्रशासनाकडून लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वसई-विरार क्षेत्रात रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सध्या नवी मुंबईत तुरळक स्वरुपाचा पाऊस पडत आहे. वाशी टोल नाक्यावर सुद्धा गाड्यांची वाहतूक मध्यम स्वरूपात सुरळीत सुरु आहे. पालघरमध्ये काल संध्याकाळ पावसाने जोर पकडला आहे. समुद्रात लाटाही उसळत आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम, वीज पुरवठा खंडित

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. पहाटेपासून वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरीतील मंडणगड. दापोली आणि गुहागरला सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे.  सिंधुदुर्गात रात्रभर रिमझिम पडणारा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

तर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात रिमझिम पाऊस होत आहे. पहाटेपासून अनेक भागात पाऊस पाहायला मिळत आहे. सलग चौथ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी (Cyclone Nisarga Mumbai Rain) लावली.

संबंधित बातम्या : 

‘निसर्ग’चे काऊंटडाऊन सुरु, अलिबागपासून 155 किमी, मुंबईहून 200 किमी अंतरावर

Nisarga Cyclone | 3 जून दुपारी अलिबाग ते वरळी, 4 जून मध्यरात्री 2 वणी ते शिरपूर, धुळे मार्गे मध्य प्रदेश

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/cyclone-nisarga-heavy-rain-lashes-in-mumbai-pune-konkan-and-many-parts-of-maharashtra-226839.html