मुंबई बातम्या

1882 च्या विनाशकारी ‘द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन’ बद्दलची Inside Story ! – Sakal

मुंबई – मुंबई एक असं शहर जे कधीही थांबत नाही. देशाच्या विविध भागातून मुंबईत लाखो, करोडो लोकं मुंबईत येतात, आपल्या पोटापाण्यासाठी मेहनत करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात. मुंबईत दर वर्षी येणारा मुसळधार पाऊस असो किंवा मुंबईवर होणारे दहशतवादी हल्ले. ही मुंबई कधीही थांबलीय नाहीये. याला अपवाद ठरला तो म्हणजे कोरोना. गेल्या २ महिन्यांपासून मुंबई थांबलीये, सर्व काही ठप्प झालंय. कोरोनाचं संकट मुंबईत थैमान घालत असतानाच आता मुंबईकडे आणखी एक संकट येऊ पाहतंय. हे संकट आहे चक्रीवादळाचं. ‘निसर्ग’ नामक एक चक्रीवादळ मुंबई,  ठाणे,  पालघर या भागात धडकू शकतं असा एक अंदाज लावला जातोय. या अनुषंगाने प्रशासन देखील सज्ज झालंय. NDRF च्या टीम्स तैनात करण्यात आल्यात. शेल्टर हाऊस म्हणजेच लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या जागा देखील तयार आहेत. पण मुंबईत असं पहिल्यांदा होतंयकी मुंबईला चक्रीवादळाची देखील सवय आहे? जाणून घेऊयात.     

मोठी बातमी – काय मुंबईकर; टपरीवरचा चहा मिस करताय? मग ही खास बातमी तुमच्यासाठी 

मुंबईत तसं वादळ येण्याचं कधी ऐकिवात नाही किंवा तास काही इतिहास नाही. मात्र असं बोललं जातंय की अनेक वर्ष आधी, म्हणजेच ६ जून १८८२ मध्ये मुंबईत महाभयंकर वादळ आलं होतं. याला ‘द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन’ असं नाव दिलं गेलंय. यामध्ये तब्बल एक लाख लोकांनी आपला जीव गमावला असं देखील बोलतात. मात्र खरंच असं वादळ आलेलं का ? याबद्दल अधिक खोलात तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आलीये. मुंबईत ‘द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन’ आलेलं यावर अनेक संशोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.        

अमेरिकेतील कोलंबिया  युनिव्हर्सिटी आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी तसेच पुणे हवामान खात्याच्या माहितीनुसार १८८२ मध्ये आलेलं ‘द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन’ म्हणजे केवळ असल्याचं म्हटलंय. भारतीय हवामान विभाग म्हणजेच (IMD) कडे १८७७ ते १९७० पर्यंतचा दररोजचा हवामानाचा अंदाज याचसोबत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आलेल्या आलेल्या विविध चक्रीवादळांचा डेटा उपलब्ध आहे. यामध्ये १८८२ मध्ये जून महिन्यात अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारचं चक्री वादळ आला होतं याबाबत नोंद नाही. 

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ऍडम सोबेल यांनी  ‘द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन’ बाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध रिसर्च पेपर्स, पुस्तकं आणि इतर लेखनात याबाबत त्यावेळी आलं होतं. मात्र यावर अधिक अभ्यास केला असता छापून आलेली माहिती ही निव्वळ अफवा असल्याचं संपूर्ण अभ्यासाअंती समोर आल्याचं IITM च्या डॉक्टर पार्थसारथी मुखोपाध्याय यांनी सांगितलंय.       

मोठी बातमी – ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं तरीही घाबरू नका, चक्रीवादळाआधी आणि नंतर काय करावं किंवा करू नये, वाचा..

मात्र भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक एल एस राठोड यांचं म्हणणं विरुद्ध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार १८८२ मध्ये ‘द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन’ खरंच आलं होतं. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली गेली नाही किंवा छापील स्वरूपात पुढे आली नाही. याबाबत जेवढी केवढी माहिती होती ती काळाच्या ओघात पुसट होऊन विरली असं देखील त्यांचं म्हणणं आहे. राठोड यांच्या माहितीनुसार त्यावेळच्या मुंबई शहराच्या बंदरावर या चक्रीवादळाचा परिणाम झाला होता. याबाबत इतिहास तज्ज्ञांकडून माहिती घ्यायला हवी असंही ते म्हणालेत.  

याबाबत इतिहासकार दीपक राव यांनी महत्त्वाची माहिती दिली. राव यांच्या माहितीप्रमाणे शंभर वर्षांपूर्वी जर एखादं एवढं मोठं चक्रीवादळ आलं असेल आणि यामध्ये लाखभर लोकं मृत्युमुखी पडले असतील तर इंग्रजांनी याबाबत नक्की माहिती ठेवली असती, असं राव म्हणतात. दरम्यान, त्यावेळच्या भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई अगदी लहान होती. मुंबईचा विस्तार हा १९४५ पासून पुढे झाल्याचंही ते म्हणतात. त्यामुळे तेंव्हा जर एवढं मोठं वादळ आलं असतं तर संपूर्ण लोकसंख्या उध्वस्त झाली असती.  

मोठी बातमी – गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता होणार सुरु, पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास…

डॉक्टर मुखोपाध्याय यांच्या माहितीप्रमाणे मुंबईत कधीही चक्रीवादळ आलेलं नाही किंवा चक्रीवादळामुळे मुंबईत कधीही नैसर्गिक आपत्ती आलेली नाही. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळांमुळे मुंबईतील पावसाचं प्रमाण आणि त्याचसोबत हवेचा वेग नक्कीच वाढल्याचं ते म्हणतायत. 

the great bombay cyclone and important information about cyclones in mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/great-bombay-cyclone-and-important-information-about-cyclones-mumbai-301363