मुंबई बातम्या

शाब्बास मुंबई ! मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या विक्रमी, एका दिवसात इतके हजार गेलेत घरी – Sakal

मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

असे असले तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी नव्या 2,682 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात मृतांच्या आकड्याने उच्चांंक गाठला असून आज तब्बल 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 2098 वर पोचला आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,228 झाली असून राज्यात 33,124  ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

BIG NEWS – Coronavirus : पावसाळ्यापूर्वी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय…

राज्यात शुक्रवारी 116 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे 58, मुंबई -38, नवी मुंबई -9, भिवंडी -3, रायगड 2, मीरा भाईंदर 3, पनवेल 1, ठाणे 1, कल्याण डोंबवली 1, नाशिक 32 , जळगाव 17 , नाशिक 3, मालेगाव 5, धुळे 7 , पुणे     16 , पुणे  -13, सोलापूर -3, कोल्हापूर 3, औरंगाबाद 5 , अकोला 2 ,अमरावती  2 मृतांचा समावेश आहे.

शुक्रवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 77 पुरुष तर 39 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 116 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 48  रुग्ण आहेत तर 55  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 13 जण 40 वर्षांखालील आहे. या 116 रुग्णांपैकी 75 जणांमध्ये ( 65 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2098 झाली आहे. 

शुक्रवारी नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 46 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 16 मे ते 26 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 70 मृत्यूंपैकी मुंबई 16, जळगाव- 14, नवी मुंबई -9, धुळे 6, मालेगाव 5  , औरंगाबाद 3, भिवंडी3, नाशिक 3 , अमरावती 2 , कोल्हापूर 2, मीरा भाईंदर 2 , रायगड 2 , सोलापूर 2 आणि  मृत्यू ठाणे येथील आहे. 

मोठी बातमी – मुंबईकरांच्या मनात ट्रेनची दहशत? लॉकडाऊन नंतर मुंबईकर लोकलने प्रवास करणार का ? मुंबईकर म्हणतायत

67.68  लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4,33,557 नमुन्यांपैकी 62,228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 2941 झोन क्रियाशील असून आज एकूण 17,600 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 67.68  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

मान्सूनपूर्व तयारीचे आदेश
मान्सून उंबरठयावर उभा आहे, हे लक्षात घेता येणा-या काळात कोविड19 शिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोविड 19 साठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.

more than seven thousand covid patients turned negative in mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/more-seven-thousand-covid-patients-turned-negative-mumbai-300008