मुंबई बातम्या

मुंबईत 24 तासात 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने 196 बाळ निगेटिव्ह – TV9 Marathi

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्रसुती झालेल्या 192 महिलांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह (Mother Deliver Corona Negative Baby Mumbai) आली आहे. मात्र सुदैवाने 196 नवजात बाळांच्या टेस्ट मात्र कोरोना निगेटिव्ह आल्या आहे. त्यामुळे आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही या बालकांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबई सेंट्रल येथे असलेल्या नायर रुग्णालयात 14 एप्रिलपासून आतापर्यंत 192 कोरोना पॉझिटिव्ह (Mother Deliver Corona Negative Baby Mumbai) महिलांची प्रसुती झाली. त्यांनी 196 बाळांना जन्म दिला. या महिलांना कोरोना असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून बाळांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने यातील एकाही बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विशेष म्हणजे यातील 138 जणांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तसेच 14 एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास 325 कोरोना पॉझिटिव्ह माता नायर रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी काहींची प्रसुती झाली आहे. तर काही जण अद्याप उपचार घेत आहेत.

राज्यात 24 तासात 8 हजार 381  रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात काल दिवसभरात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला फार मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण 26 हजार 997 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तर राज्यात काल दिवसभरात 2 हजार 682 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 62 हजार 228 वर पोहोचली आहे.

तर काल दिवसभरात 116 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 2 हजार 098 वर पोहोचली (Mother Deliver Corona Negative Baby Mumbai) आहे.

संबंधित बातम्या : 

मालेगावात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, रेल्वेच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनाही लागण

Wardha Corona | वर्ध्यात 3 वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांची कोरोनावर मात

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/bmc-nair-hospital-192-corona-positive-mother-deliver-196-corona-negative-baby-225404.html