मुंबई बातम्या

मुंबई मेट्रोमध्ये सोशल डिस्टन्सिंगची तयारी सुरु – मुंबई लाइव्ह

लॉकडाऊनंतर भविष्यात मेट्रो प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी आसन व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहेत. प्रवासादरम्यान दोघांमध्ये सुरक्षित अंतर राहावं यासाठी आता एक आड एक आसन बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मुंबईत लवकरचं मेट्रो सुरू करण्यासाठी मुंबई मेट्रोकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. 

मेट्रोने प्रवास करण्यासाठी कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे. मुंबई मेट्रोनं या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. यापुढे मेट्रोमध्ये अजिबात गर्दी दिसणार नाही. सोबतचं आसन व्यवस्था देखली सोशल डिस्टन्स पाळून तयार करण्यात येत आहे.

मेट्रोचं नियोजन

  • लॉकडाऊननंतर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेट्रो प्रवासातून प्लास्टिक टोकन हद्दपार होणार
  • डिजीटल तिकीट व्यवस्थेवर मेट्रो भर देणार, त्यासंबंधीची तयारी सुरू
  • लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबई मेट्रो जेव्हा रुळांवर धावेल तेव्हा मेट्रोतून प्रवासाचे नियम बदललेले असतीलं
  • आसनव्यवस्थेतील बदलासोबतच मुंबई मेट्रो तिकीटाचे प्लास्टिक टोकनही बंद करणार
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रो प्रशासनानं काही बदल करायचे ठरवले आहेत
  • यात एका रिकाम्या सीटचे अंतर ठेऊन असणारी आसनव्यवस्था अमलात आणली जाईल. तसे स्टिकर्स सध्या मेट्रोच्या सीटस् वर लावले जातायेत
  • तर, मेट्रोचे तिकीट म्हणून दिले जाणारे प्लास्टिक टोकनही आता बंद होणार आहे
  • त्याऐवजी पेपर तिकीट, डिजीटल तिकीट, स्मार्ट कार्डचा वापर केला जाऊ शकतो

हेही वाचा –

पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी एका वर्षासाठी स्थगित

तब्बल २ महिन्यानंतर मुंबई लोकल ट्रेन रुळावर…


Source: https://www.mumbailive.com/mr/transport/coronavirua-live-updates-mumbai-metro-putting-stickers-seats-maintain-physical-distancing-50027