मुंबई बातम्या

मुंबई पुणे, नाशिक या शहरातून आलेले केले जाताय होम क्वारंटाईन; मात्र त्यातील एकाने केली ही मोठी चूक – Sakal

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होताना दिसून येत आहे. प्रशासनामार्फत याकरिता शक्यतो प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे मुंबई पुणे, नाशिक व यासह अनेक हायरिक्स शहरांमधून आलेल्या नागरिकांना नगरपालिकेच्यावतीने खबरदारी म्हणून 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाते. सिंदखेडराजा शहरातील एका व्यक्तींनी होम क्वारंटाईनचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक नगरपालिकेचे लिपिक नानाराव नारायण इंगळे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, शहरातील मोठा बौद्धवाडा येथील आशा प्रदीप म्हस्के यांनी पालिकेत येऊन, सांगितले की माझा मुलगा अमोल प्रदीप म्हस्के (वय 25) हा वाहन चालक म्हणून काम करतो. अमोल म्हस्के हा वाहन चालक म्हणून 1 मे ला मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश अशा विविध शहरांमध्ये जाऊन प्रवाशांना आणण्याचे काम केले. 13 मे ला सिंदखेडराजा शहरात परत आला.

आवश्यक वाचा – सावधान! तुम्ही फसव्या लिंकवर तर क्लिक करीत नाही ना, सायबर हल्लेखोरांनी पसरवल्या आहेत फसव्या लिंक

तो हा हायरिस्क झोनमध्ये जाऊन आल्यामुळे त्याला वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा यांनी 14 दिवस होम क्वारंटाईन केले होते. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन करून त्यांचा शिक्का मारला होता. त्याला घरीच राहण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्याने होम क्वारंटाईनचे कोणतेही नियम न पाळता तो शहरांमध्ये फिरत होता. त्याच प्रमाणे वाहन चालक म्हणून चंद्रपूरला प्रवासी आण्यासाठी गेला असल्याची माहिती त्याची आई आशा प्रदीप म्हस्के यांनी नगरपालिका येथे येऊन सांगितले. 

त्यामुळे नगरपालिकेचे कर्मचार्‍यांनी अमोल म्हस्के त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता तो दिसून आला नाही. त्याच प्रमाणे त्याला शहरामध्ये सुद्धा शोध घेतला असता दिसून आला नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचार्‍यांनी प्रदीप म्हस्के यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता प्रदीप म्हस्के याने सांगितले की, मी सिंदखेड राजा शहरात आहे. परंतु, त्यांचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. 

त्यामुळे पालिकेचे दीपक नानाराव नारायण इंगळे (वय 53) यांनी पोलिस स्टेशन सिंदखेडराजा येथे तक्रार दिली, त्या तक्रारीवरून शहरातील नागरिकांना कोविड-19 संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोक्याबाबत माहिती असताना व प्रदीप मस्के स्वतः होम क्वारंटाईन असताना नियमाचे पालन केले नाही, जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे प्रदीप म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार जयंत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी पोलिस विश्वास काकड करीत आहे.

Source: https://www.esakal.com/vidarbha/mumbai-pune-and-nashik-return-citizen-home-quarantine-buldana-district-295821