मुंबई बातम्या

मुंबई मेट्रोनं घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय..लॉकडाऊन संपल्यानंतर होणार महत्वाचा बदल.. – Sakal

मुंबई: कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालतो आहे. मात्र कोरोनाचा शिकरकावं भारतात होण्याच्या आधी मुंबईच्या मेट्रो वननं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. तो म्हणजे प्लॅस्टिकचे टोकन बंद करून त्या जागेवर कागदाचे क्यूआर तिकीट वापरणे. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मेट्रो बंद झाली. मात्र आता लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं मुंबई मेट्रो वनकडून सांगण्यात आलं आहे.  

सर्वात धक्कादायक बातमी ! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त अचानक झाले बेपत्ता; प्रशासनाकडून शोधाशोध सुरु.. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) मेट्रो सिस्टममध्ये प्लॅस्टिकची टोकन तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान संपूर्ण मेट्रो वन मार्चपर्यंत कागदाच्या क्यूआर तिकिटांचा वापर करणार होती. मात्र देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानं या योजनेला ब्रेक लागला होता. मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर ही योजना पुन्हा लागू होईल असं मेट्रो वनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

घाटकोपर ते वर्सोवा  या ११.४० किमी मेट्रो मार्गिकेवर १२ स्थानक आहेत. या मार्गवरुन ४.५ लाख प्रवाशांची संख्या आहे. कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर २२ मार्चपासून मेट्रोची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान मेट्रो वन जानेवारीमध्ये प्लास्टिक टोकनवरून कागदावर आधारित क्यूआर तिकिटांवर स्विच करण्यास सुरवात केली आहे. 

धक्कादायक ! तरुणाच्या मृतदेहाऐवजी पालकांना दिला तरुणीचा मृतदेह; गायब झालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं..

मात्र  संपूर्ण मेट्रो वन मार्चपर्यंत कागदाच्या क्यूआर तिकिटांचा वापर करणार होती. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे या योजनांना काही प्रमाणात ब्रेक लागला . या कागदाच्या तिकीटामुळे नोटांच्या पृष्ठभागाशी कोणताही संपर्क होऊ नये म्हणून प्रवाशांना मोबाईल फोनवर तिकीट मिळवण्यास प्रोत्साहित करणार आहे असं मेट्रो वनकडून सांगण्यात आलंय.

mumbai metro one has taken decision of not to use plastic tocken read full story 

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-metro-one-has-taken-decision-not-use-plastic-tocken-read-full-story-295238