मुंबई बातम्या

Workers of Bombay Rayon factory protest on road demanding to file case zws 70 | बॉम्बे रेयॉन कारखान्यातील कामगार रस्त्यावर – Loksatta

कारखानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बोईसर : वर्षभरापासून अनेकदा आंदोलन करणारे बॉम्बे रेयॉन कारखान्यातील कामगारांनी संचारबंदीत पुन्हा आंदोलन केले. चार महिन्यांपासून कारखानदार वेतन देत नसल्याने शेकडो कामगार रस्त्यावर उतरले होते. मात्र बोईसर पोलिसांनी कामगारांना वेळीच आवर घालत कारखानदारा सोबत समजोता करून दिल्यानंतर संध्याकाळी आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन फॅशन लि. या कारखान्यात प्रत्येक दोन महिन्यांनंतर कामगार वेतन मिळत नसल्याने आंदोलन केले जाते. लॉकडाऊन झाल्यानंतर या कारखानदाराने अगोदरच्या महिन्यात काम के लेल्याचे वेतनदेखील दिलेले नाही. यामुळे वैतागलेल्या कामगारांनी कारखान्यांच्या आवारात एकच गर्दी केली होती. सकाळपासूनच शेकडो कामगार या ठिकाणी जमा झाले होते. बोईसर पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी लागलीच याबाबत घटनास्थळी जावून कामगारांना शांतता राखण्याचे आव्हान करत. या ठिकाणी कामगारांना भडकविण्याचा प्रयत्न करत असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सर्व कामगारांना बोईसर पोलीस ठाण्यात बोलवून कामगार विभाग, कारखाना व्यवस्थापक व कामगार यांच्यामध्ये पोलिसांनी समजोता केल्यानंतर कारखाना व्यवस्थापकाने टप्प्याटप्प्याने कामगारांचे वेतन देण्याचे मान्य केले.

संचारबंदीत जमाव करून कामगारांना एकत्र करण्याचा काही लोकांनी प्रयत्न के ला होता. तर कामगार भडकविण्याचे प्रयत्न देखील झाले होते. मात्र यामधील ताब्यात घेतलेल्या एकाला बोईसर पोलिसांनी नोटीस बजावून सोडून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 19, 2020 4:43 am

Web Title: workers of bombay rayon factory protest on road demanding to file case zws 70

Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/workers-of-bombay-rayon-factory-protest-on-road-demanding-to-file-case-zws-70-2165536/