मुंबई बातम्या

Navi Mumbai Talawe wetlands in NRI Complex wetland pink lake formed | अहो आश्चर्यम्… मुंबईत निर्माण झालं गुलाबी तळं – Loksatta

ऑस्ट्रेलियामधील पिंक लेक म्हणजेच गुलाबी तळ्याबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. अनेकांनी या पिंक लेकचे फोटो आणि व्हिडिओही इंटरनेटवर पाहिले असतील. आकाशातून कॅमेरात कैद केलेलं ऑस्ट्रेलियामधील दक्षिण प्रांतातील तलाव हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मात्र आता मुंबईमध्येही असं एक पिंक लेक अढळून आलं आहे. नवी मुंबईमधील तलावी येथील एनआरआय कॉम्पेक्सजवळच्या खारपुटी भागामध्ये हे पिंक लेक अढळून आलं आहे. या भागामध्ये दीड लाख देशी-परदेशी पक्षी विशेषत: फ्लेमिंगो वर्षेभरात अन्नाच्या शोधात येत असतात. सध्या असेच हजारो पक्षी या परिसरात वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे प्रदुषण आणि निसर्गामध्ये होणारा मानवी हस्ताक्षेप कमी झाल्यामुळे हे पिंक लेक तयार झाल्याचे, ‘द हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या भागातील खारपुटी वनस्पती असणाऱ्या भागामधील एका ठिकाणी खाडी परिसरात हा पिंक लेक तयार झाला आहे. प्रतिक चोरगे या फोटोग्राफरच्या नजरेत हा पिंक लेक पहिल्यांदा आला. उष्ण हवामानामध्ये खारट पाण्यात वाढणाऱ्या रेड अल्गी म्हणजेच लाल रंगाच्या बुरशीमुळे या पाण्याचा गुलाबी रंग आल्याचे वैज्ञानिक कारण दिले जात आहे. हे तलाव मागील आठवड्यापर्यंत या भागामध्ये नव्हते. मात्र आता ते प्रामुख्याने दिसून येत आहे. अशाप्रकारे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये पहिल्यांदाच पिंक लेक आढळून आलं आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने’ (बीएनएचएस) या तलावातील पाण्याचे नमूने अभ्यासाठी गोळा करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र येथील काही स्थानिकांनी या आधी म्हणजेच २०१६ सालीही अशाच प्रकारचे पिंक लेक या भागामध्ये दिसल्याचे म्हटले आहे.

(एम्बेड पोस्ट:प्रतिक चोरगे यांच्या फेसबुकवरुन)

या भागातील पाण्याला गुलाबी रंग कशामुळे आला आहे हे अद्याप ठोसपणे सांगता येत नसले तरी बीएनएचएससोबत काम करणाऱ्या एका संशोधकाने लाल रंगाच्या अतीसूक्ष्म बुरशीमुळे हा लाल रंग पाण्याला आल्याची शक्यता व्यक्त केली आहे. खारट पाण्यामध्ये लाल बुरशीचे प्रमाण वाढल्याने या पाण्याला गुलाबी रंग आला असल्याचा अंदाज आहे. मुंबई आणि परिसरामध्ये खाडी प्रदेशात अशाप्रकारे लाल रंगाचे पाणी याआधी कधीच अढळून आलेले नाही, असं बीएनएचएसचे अध्यक्ष दिपक आपटे यांनी स्पष्ट केलं.

जगभरातील अनेक भागांमध्ये अशाप्रकारची लाल तळी अढळून आली आहेत. मात्र मुंबईमध्ये कशामुळे असं तळं निर्माण झालं याबद्दल संशोधन करणे गरजेचे आहे, असंही आपटे यांनी सांगितलं. नवी मुंबईमधील या भागामध्ये दर वर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी हे ज्या झोपलॅनकेटॉन खातात. हे झोपलॅनकेटॉन या लाल रंगाच्या बुरशीवर जगतात. यामुळेच फ्लोमिंगोंना लाल आणि गुलाबी रंग प्राप्त होतो असं आपटे सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 18, 2020 11:59 am

Web Title: navi mumbai talawe wetlands in nri complex wetland pink lake formed scsg 91

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/navi-mumbai-talawe-wetlands-in-nri-complex-wetland-pink-lake-formed-scsg-91-2164693/