मुंबई बातम्या

राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणेमध्ये कोरोना रुग्णांत वाढ – Zee २४ तास

मुंबई : कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगर ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तर पनवेल, उरण या ठिकाणीही रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या काही तासात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.  असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८७२ झाली  आहे, काल दिवसभरात कोरोनाचे ९३ रुग्ण आढळले होते. दिवसभरातली रुग्णसंख्या पाहाता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रादुर्भाव होतोय. औरंगाबाद शहरात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशीलाप्रमाणे आहेत. या एमजीएम मेडिकल कॉलेज (३),  हनुमान चौक, चिकलठाणा (१), राम नगर (३), एमआयडीसी (१), जालान नगर (१), संजय नगर, लेन नं.६ (१), सादात नगर (४), किराडपुरा (१), बजाज नगर (१), जिनसी रामनासपुरा (१), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (१), जहागीरदार कॉलनी (१), आदर्श कॉलनी (१), रोशन गेट (१) यांचा समावेश आहे.

तर नागपुरात शुक्रवारी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर  पडले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची  संख्या झाली ३३६ वर गेला आहे. आतपर्यंत १९३ रुग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यात रात्री ६२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ३६२९ झाली असून एकूण मृत्यू १८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड येथे कोरोनाचे नव्याने १८ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ८४ वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या १८ पैकी १३ जण प्रवाशी आहेत. चार रुग्ण करबला आणि एक रुग्ण कुंभार गल्लीतील असून सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच जणांचा झालाय मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये एका महिलेचा आणि पुरुषाचा समावेश. दोन्ही रुग्ण जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या २३७ इतकी झाली असून त्यापैकी ३५ व्यक्ती कोरोनामुक्त तर २८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५वर गेली आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह मंठा तालुक्यातील पेवा गावच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सात रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना काल घरी सोडण्यात आले आहे. कोविड -१९ रुग्णालयात सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Source: https://zeenews.india.com/marathi/maharashtra/increase-in-corona-patients-in-mumbai-nagpur-aurangabad-pune/520302