मुंबई बातम्या

मुंबई बनत चाललंय जागतिक कोरोना हॉटस्पॉट केंद्र – Zee २४ तास

मुंबई : बुधवारी मुंबईत कोरोनाचे 800 रुग्ण वाढले तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. रुग्णालये आधीच पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत आणि शहराला त्वरित भविष्यातील येणाऱ्या बिकट वाईट परिस्थितीसाठी तयार करावे लागेल.

9 मे पासून जगातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या न्यूयॉर्क शहरापेक्षा मुंबईत दररोज अधिक वाढत आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहिला मिळाला. 

न्यूयॉर्क शहरातील रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांची भरती मुंबईच्या तुलनेत कमी आहे. कारण सर्व पॉझिटीव्ह टेस्ट आलेले रुग्ण रुग्णालयात दाखल केले जात नाही. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच, अशी स्थिती आहे की दररोज न्यूयॉर्कमधील रुग्णालयात मुंबईपेक्षा कमी नवे रूग्ण दाखल होत आहेत.

मुंबईतील रुग्णालये आधीच त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार कार्यरत आहेत. दररोज बेडची संख्या वाढवत असल्याचा दावा प्रशासन करत आहे. हे स्वतःच मुंबईच्या आरोग्य सेवा क्षेत्रावर दबाव वाढविण्याचे लक्षण आहे.

न्यूयॉर्क शहरात जगातील इतर कोणत्याही शहरांपेक्षा मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतु तेही आता कमी होताना दिसत आहे. पण मुंबईत दररोज मृत्यूची संख्या वाढत आहे.

न्यूयॉर्कचे एकंदर चित्र वाईट आहे. न्यूयॉर्कमध्ये मुंबईत एकूण रुग्ण आहे तितक्या मृत्यूची नोंद झाली आहेत. हे न्यूयॉर्कमध्ये किती मोठे संकट आहे हे दर्शवते.

मुंबईत बुधवारी 800 नवे रुग्ण वाढले. मुंबई सध्याच्या घडीला जगातील एक हॉटस्पॉट शहर म्हणून उदयास येत आहे. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. परंतु या दोन्ही शहरांमध्ये सर्वात वाईट अवस्था झाली आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो आणि रशियातील मॉस्को शहरातही अशीच स्थिती आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-become-global-corona-hotspot/520206