मुंबई बातम्या

Coronavirus : ना लष्कर बोलावणार, ना जीवनावश्यक वस्तूंची दुकानं बंद करणार; मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा – Lokmat

ठळक मुद्देकाही दिवसांपासून मुंबईत लॉकडाऊन कठोर होणार, जीवनावश्यक वस्तूही मिळणं बंद होणार, मुंबईत लष्कर बोलावणार  अशी चर्चा सुरू आहे. फक्त शांत रहा आणि घरी रहा. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करण्याची गरज आहे.

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु आहे. दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, काही दिवसांपासून मुंबईत लॉकडाऊन कठोर होणार, जीवनावश्यक वस्तूही मिळणं बंद होणार, मुंबईत लष्कर बोलावणार  अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत असे काहीही होणार नसल्याचा खुलासा केला आहे. 

मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की, आम्हाला माहित आहे की आता तुमच्याकडे बराच मोकळा वेळ आहे. परंतु याचा उपयोग अफवा पसरविण्यापेक्षा चांगल्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच केला जाऊ शकतो. आपल्याला जीवनावश्यक गोष्टी मिळणं बंद होणार नाही तसेच लष्कर किंवा निमलष्करी दलालाही बोलावले जाणार नाही. फक्त शांत रहा आणि घरी रहा. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करण्याची गरज आहे.

अशा प्रकारे अफवांना लगाम देण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्विटच्या माध्यमातून अनेक उधाण सुटलेल्या चर्चांबाबत खुलासा केला आहे. 

Web Title: Coronavirus : No army will be called out, no shops will be closed; Big revelation from Mumbai Police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/mumbai/coronavirus-no-army-will-be-called-out-no-shops-will-be-closed-big-revelation-mumbai-police-pda/