मुंबई बातम्या

Mumbai Corona Update : बीडीडी चाळ 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन, बीएमसी आणि पोलिसांचा निर्णय – TV9 Marathi

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली (BDD Chawl Corona Update) आहे. मुंबईतील बीडीडी चाळ येथील कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठ दिवस बीडीडी चाळ पूर्णपणे सील असणार आहे. बीडीडी चाळीतल्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे महापालिकेने आणि मुंबई पोलीस प्रशासनाने (BDD Chawl Corona Update) हा निर्णय घेतला आहे.

मुंबई जी-साउथमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही 871 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 305 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता सध्या बीडीडी चाळ पूर्णपणे बंद ठेवण्याची गरज असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. त्याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं. त्यानंतर बीडीड चाळ 8 दिवस पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात (BDD Chawl Corona Update) आला.

“वरळी आणि डिलाईल रोड बीडीडी चाळी पूर्णत: लॉकडाऊन करण्याची गरज आहे. महापालिका प्रशासनाकडून बीडीडी चाळीबाबत पोलिसांना पत्र पाठवण्यात आलं आहे. किमान पुढील 8 दिवस बीडीडी चाळ पूर्णत: लॉकडाऊन करावी लागणार”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

या निर्णयानंतर आता बीडीडी चाळीतील रहिवाशांना समजावण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.

मुंबईत एका दिवसात 510 नवा रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 9123 वर

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता आता वाढली आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 9 हजार 123 वर येऊन पोहोचली आहे. मुंबईत आज दिवसभरात 18 जणांचा मुंबईत मृत्यू, मुंबईतील मृत्यूचा आकडा 361 वर, तर मुंबईत आतापर्यंत 1,908 रुग्ण बरे (BDD Chawl Corona Update) झाले आहेत.

संबंधित बातम्या :

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच, भवानी पेठेत 39 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

Lockdown : लॉकडाऊन असूनही ‘कोरोना’ का पसरतोय?

रखडलेल्या मेगाभरतीला पुन्हा स्थगिती, कोरोनामुळे 70 हजार जागांची भरती पुन्हा रखडली

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-bdd-chawl-corona-update-bdd-chawl-is-lockdown-for-eight-days-due-to-corona-patients-increased-215509.html