मुंबई बातम्या

Coronavirus in Mumbai : नवे रुग्ण ४४१; २१ जणांचा मृत्यू – Loksatta

एकूण बाधित ८६१३

मुंबई : मुंबईत रविवारी आणखी ४४१ रुग्णांची नोंद झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील करोना बाधित रुग्णांचा आकडा ८६१३ वर, तर मृतांची संख्या ३४३ झाली आहे. दिवसभरात १०० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. धारावीतही एकाच दिवसांत ९४ रुग्णांची नोंद झाल्याने येथील रुग्णांची संख्या ५९० झाली आहे.

सरकारी प्रयोगशाळेतील अहवालांनुसार रविवारी ३८१ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. खाजगी प्रयोगशाळेतील ६० जणांचे अहवाल पालिके ला आज मिळाले. त्यामुळे एकू ण ४४१ रुग्णांची रविवारी नोंद झाली. आतापर्यंत करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा १८०४ वर पोहोचला आहे.  आणखी ४६९ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या २१ जणांमध्ये १२ पुरुष आणि ९ महिला होत्या. यातील दहा जणांना काही दीर्घकालीन आजार होते, तर सात जणांच्या मृत्यूमागे वाध्र्यक्य हे कारणही असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. यापैकी ११ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. तर ९ जणांचे वय ४० ते ६० आणि एका मृताचे वय ४० वर्षे होते.

दादर, माहीममध्येही रुग्ण

माहीममध्ये रविवारी १६ नवीन रुग्ण आढळल्याने या ठिकाणची रुग्णसंख्या ६८ तर दादरमध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने या ठिकाणची रुग्णसंख्या ५० झाली आहे. दादरमध्ये आतापर्यंत चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 4, 2020 4:22 am

Web Title: coronavirus outbreak mumbai reports 441 fresh cases

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-outbreak-mumbai-reports-441-fresh-cases-2149053/