मुंबई बातम्या

CoronaVirus News in Mumbai: कोरोनाच्या भीतीने पोलिसाचीच पळापळ, मुंबई ते सातारा प्रवास – Lokmat

मुंबई : कोरोनाच्या भीतीने नायगाव येथील पोलीस शिपाई महिलेच्या पतीने मुंबईतून गावी साताऱ्याला पळ काढला. गावी क्वारंटाइन केल्याने तेथूनही कंटाळून पुन्हा मुंबई गाठल्याने, भोईवाडा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबईत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत पोलीस मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. अशात नायगाव बीडीडी चाळ येथे राहणाºया महिला पोलीस शिपाई यांच्या पतीने २६ मार्च रोजी मुंबई येथून सातारा येथे त्यांच्या राहते गावी पळ काढला. याबाबत सातारा पोलिसांना समजताच वैद्यकीय तपासणी करून त्यांना ८ एप्रिल रोजी क्वारंटाइन करण्यात आले. अखेर तेथेही कंटाळून १२ एप्रिल रोजी ते मुंबईत पळून आले़ सातारा पोलिसांकडून याबाबत नायगाव सशस्त्र पोलीस दलाकडे एक क्वारंटाइन रुग्ण पळून गेल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या घरी चौकशी करताच ते मिळून आले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांना मुंबईतल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला भोईवाडा पोलिसांनी दुजोरा दिला़

Web Title: Fearing the corona, the police fled from Mumbai to Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/mumbai/fearing-corona-police-fled-mumbai-satara/