मुंबई बातम्या

‘सलाम बॉम्बे’ ते ‘लाईफ ऑफ पाय’; संपूर्ण जगाने नोंद घेतलेला एकमेव भारतीय अभिनेता – Loksatta

रुपेरी पडद्यावर धम्माल करणारे कलाकार पाहिले की अभिनयसृष्टीत करिअर करण्याची इच्छा जवळपास प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होते. परंतु त्यांपैकी फारच कमी जण असतात ते आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर त्या रुपेरी पडद्यावर झळकतात. अभिनेता इरफान खान देखील अशाच हरहुन्नेरी कलाकारांपैकी एक होता. आश्चर्याची बाब म्हणजे कुठलेही फिल्मी बॅकग्राऊंट नसताना इरफानने जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये आपली ओळख निर्माण केली.

भारतीय रंचमंच, मालिका आणि चित्रपटांपूरतेच इरफानने स्वत:ला मर्यादीत ठेवले नाही. तर त्यापुढे थेड हॉलिवूडपर्यंत त्याने मजल मारली. ‘द वॉरिअर्स’, ‘अ मायटी हार्ट’, ‘द दार्जिलींग लिमिटेड’, ‘न्यूयॉर्क आय लव्ह यू’ अशा चित्रपटांमधून लहानमोठ्या भूमिका साकारत त्याने हॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले. खरं तर हे चित्रपट तिकीटबारीवर फार काही कमाल करु शकले नाही. मात्र यांमधून इरफान खान नावाचा एक अनोखा अभिनेता संपूर्ण जगासमोर आला.

[embedded content]

[embedded content]

हॉलिवूड म्हटलं की पिळदार शरीराचे हिरो, मोठमोठे स्टंट मारलेले कलाकार, अॅनिमेडेट चित्रपटांमध्ये अनोखे आवाज काढणारे व्हॉईज ओव्हर आर्टिस्ट आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु असे काहीही न करता आपल्या अनोख्या अभिनय शैलीने इरफानने हॉलिवूड दिग्दर्शकांवरही भूरळ पाडली. त्यानंतर इरफान ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘लाईफ ऑफ पाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य व्यक्तिरेखा सादर करताना दिसला. ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटामुळे तर इरफान आज जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये आज अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान असे अनेक मोठमोठे कलाकार आहेत. परंतु ‘सलाम बॉम्बे’ ते ‘लाईफ ऑफ पाय’ अशी फिनिक्स उडी घेणारा इरफान एकमेव कलाकार होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 29, 2020 1:09 pm

Web Title: irrfan khan hollywood movies carrier mppg 94

Source: https://www.loksatta.com/manoranjan-news/irrfan-khan-hollywood-movies-carrier-mppg-94-2145134/