मुंबई बातम्या

Corona: मुंबईत दोन पोलिसांचा मृत्यू – Times Now Marathi

प्रातिनिधीक फोटो&  | & फोटो सौजन्य:&nbspRepresentative Image

थोडं पण कामाचं

  • मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच 
  • कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू 
  • शनिवारी सुद्धा एका हेड कॉन्स्टेबलचा झाला होता मृत्यू 

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनामुळे आता मुंबई पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वाकोलो पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबलला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

तर रविवारी ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते संरक्षण शाखेत कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना यापूर्वी कॅन्सर झाला होता मात्र त्यांनी कॅन्सरवर मात केली होती आणि पुन्हा पोलीस दलात नोकरी सुरु केली होती. पण आता कोरोना विरुद्धची त्यांची लढाई अपयशी ठरली.

९७ पोलिसांना कोरोना 

कोरोनाशी लढताना पोलीस दलातील २० अधिकारी, ८७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहेत. यापैकी ३ पोलीस अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा मुंबईत आहे. कोरनाचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. तसेच डॉक्टर, सरकार, पोलीस प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांनी केलेली कारवाई

  1. राज्यात कलम १८८ नुसार ७२ हजार ६९८ गुन्हे दाखल

  2. १५ हजार ४३४ व्यक्तींना अटक

  3. अवैध वाहतूक करणाऱ्या १०९२ वाहनांवर गुन्हे

  4. ४७ हजार ७८२ वाहने जप्त

  5. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद

  6. विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख रुपयांचा दंड वसूल

  7. पोलिसांवर हल्ल्याच्या १५० घटना; यातील ४८२ आरोपींना अटक

  8. #Dial100 वर आलेल्या ७८ हजार ४७४ कॉल्सची योग्य दखल

  9. #Quarantine शिक्का असलेल्या ६१० व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात भरती

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/maharashtra-mumbai-police-departments-two-head-constable-lost-life-due-to-coronavirus-lockdown-marathi-news/290568