मुंबई बातम्या

टेन्शन वाढलं! मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण, संख्या ४ हजार ५०० च्या वर – Loksatta

मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. २४ तासात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ज्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी सात रुग्णांना इतर गंभीर आजाराची हिस्ट्री होती. ११ मृत रुग्णांपैकी सात पुरुष तर चार महिला होत्या. या ११ मृत्यूंपैकी एक मृत्यू ८० वर्षांच्या वरील रुग्णाचा होता. तर एक मृत्यू ४० वर्षांखालील रुग्णाचा होता. इतर नऊ मृत्यू हे ४० ते ६० या वयोगटातील रुग्णांचे होते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. मुंबईतली धारावी हा हॉटस्पॉट आहे. ज्या ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले आहेत तिथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 24, 2020 8:37 pm

Web Title: 357 new covid19 cases 11 deaths have been reported in mumbai today taking the total number of cases to 4589 scj 81

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/357-new-covid19-cases-11-deaths-have-been-reported-in-mumbai-today-taking-the-total-number-of-cases-to-4589-scj-81-2141195/