मुंबई बातम्या

‘जी दक्षिण’मध्ये रुग्णसंख्या पाचशेपार, मुंबईत 10 वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त – TV9 Marathi

मुंबई : एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा चार हजाराच्या पार गेल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 534 वर पोहोचली आहे. मुंबईतील पाच वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी तीनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत. (Mumbai ward wise Corona Patients Map)

मुंबईत एकूण 9 वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त, तर एकूण 15 वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभरपेक्षा अधिक ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. याशिवाय चार वॉर्ड शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 23 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे.

‘जी दक्षिण’मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या वॉर्डमध्येच सर्वाधिक म्हणजे 82 रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. कालच्या दिवसात इथे 27 नवे रुग्ण सापडले. ‘के पश्चिम’, ‘ई’, ‘एम पूर्व’ वॉर्डमध्ये कालच्या दिवसात पन्नासपेक्षा जास्त, तर ‘एफ उत्तर’ आणि ‘एल’ वॉर्डमध्ये प्रत्येकी 45 नवे रुग्ण सापडले आहेत.

वॉर्डनिहाय कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या (कंसात बरे झालेले रुग्ण)

जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 534 (82) रुग्ण बरे

– भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडी बंदर – 421 (31)

एल – चुनाभट्टी, कुर्ला – 312 (40)

के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा– 311 (11)

एफ उत्तर– सायन, माटुंगा, वडाळा – 305 (19)

जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क296 (22)

डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 253 (34)

के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 229 (46)

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 215 (17)

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 184 (17)

एफ दक्षिण – परळ, शिवडी – 144 (10)

ए – कुलाबा, कफ परेड , फोर्ट – 127 (14)

एम पश्चिम – चेंबुर – 122 (3)

(Mumbai ward wise Corona Patients Map)

एस – भांडूप, नाहूर, कांजुरमार्ग, विक्रोळी116 (19)

पी उत्तर –मालाड – 106 (21)

शंभरपेक्षा कमी रुग्ण असलेले प्रभाग

एच पश्चिम – 97 (14)

एन – 94 (11)

आर दक्षिण  – 85 (14)

पी दक्षिण – 84 (16)

बी – 68 (8) 

आर मध्य – 44 (10)

सी – 30 (5)

टी– 29 (3)

आर उत्तर – 26 (6)

(Mumbai ward wise Corona Patients Map)

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/headlines/mumbai-ward-wise-corona-patients-map-update-upto-23rd-april-210923.html