मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील – TV9 Marathi

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या पार गेला (Mumbai BMC Corona Patient) आहे. आतापर्यंत मुंबईत 2 हजार 724 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांच्यानंतर आता मुंबई महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना झाला आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात काम करणाऱ्या दोन (Mumbai BMC Corona Patient) जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष खबरदारी म्हणून पालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचे मुख्यालय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी या ठिकाणी आहे. या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे. कोणत्याही आपत्ती काळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद कार्यान्वीत करण्यासाठी निरनिराळया यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम या कक्षाकडे असते.

मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट

राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलांडला आहे. काल (20 एप्रिल) राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 200 झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाबळींची संख्या ही 223 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 456 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 724 वर (Mumbai BMC Corona Patient) पोहोचला आहे.

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 2724 30 132
पुणे (शहर+ग्रामीण) 563 19 50
पिंपरी चिंचवड 48 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 130 4
नवी मुंबई 72 8 3
कल्याण डोंबिवली 69 2
उल्हासनगर 1
भिवंडी 5
मीरा भाईंदर 71 2
पालघर 17 1
वसई विरार 85 1 3
रायगड 13
पनवेल 29 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 9
मालेगाव 78 6
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 29 3 2
धुळे 1 1
जळगाव 2 1
नंदूरबार 1
सोलापूर 15 2
सातारा 11 2
कोल्हापूर 6 1
सांगली 27 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 30 5 3
जालना 1
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 16 1
अमरावती 6 1
यवतमाळ 14 3
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 69 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 13 2
एकूण 4200 331 223

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-bmc-disaster-management-room-two-people-tested-corona-positive-patient-209400.html