मुंबई बातम्या

तब्बल 24 जणांना बाधा होऊनही बॉम्बे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा सुरूच! – Sakal

कांदिवली : मरीन लाईन येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एकूण 24 डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तरीही व्यवस्थापनाने हजेरीची बायोमेट्रिक पद्धत सुरूच ठेवली आहे. त्यावर कृष्णाई माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने नाराजी व्यक्त करत ही पद्धत तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.   

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नर्स, वाॅर्ड बॉय व रुग्णांची तपासणी व त्यांचे विलगीकरणही करण्यात आले नाही, असा आरोप कामगार युनियनने केला आहे.  त्यामुळे रुग्णालयातील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या मागण्यांबाबत वारंवार रुग्णालय व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला; मात्र त्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचे कामगार युनियनचे सचिव संतोष गवळी यांनी म्हटले आहे.

कोरोनोबाधित डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांमुळे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना  कोरोनोची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापणाने तातडीने बायोमेट्रिक पद्धत बंद करावी आणि सर्वच कामगारांची तपासणी करुन त्यांचे विलगीकरण करावे. 
– संतोष गवळी, सरचिटणीस, कामगार युनियन

 
रुग्णालयातील 12 डॉक्टर, 7 नर्स आणि 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोन जण बरे झाले असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देणार आहे. बायोमेट्रीकच्या बाजुला सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची तपासणी व त्यानूसार विलगीकरण सुरूच आहे. 
रमेश भट्टड, संचालक, बाॅम्बे हाॅस्पिटल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title:

Biometric still at Bombay Hospital

Source: https://www.esakal.com/mumbai/biometric-still-bombay-hospital-283118