मुंबई बातम्या

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर, मुंबई एपीएमसीतील मार्केट ‘कोरोना हॉटस्पॉट’च्या वाटेवर? – TV9 Marathi

नवी मुंबई : आशिया खंडातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या एपीएमसीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये मोठा झोपडपट्टी सदृश भाग पाहायला मिळत आहे (Increasing Corona Patient in Navi Mumbai APMC). यामध्ये राहणाऱ्या हजारो कामगारांची कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्यापाऱ्यांनी फळे व भाजीपाला बाजारातील कार्यालयांमध्ये आणि गाळ्यांमध्येच परप्रांतीय कामगारांना राहण्याची व्यवस्था केली आहे. या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजारसमितीचे कुठलेही ओळखपत्र नाही. ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करतात त्यांच्याकडे देखील याची नोंद नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने योग्य कोणतीही राहण्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळत नाही. तेथे कमी जागेतच अनेक कामगारांना राहावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संबंधित कामगार बिनधास्तपणे मार्केटमध्ये फिरत आहेत. अनेक ठिकाणी हे कामगार एकत्र बसून गप्पा मारताचं चित्रंही दिसून येत आहे. त्यामुळे बाजार आवारात ‘समुह संसर्ग’ होण्याचा धोका आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिल्या टप्यात राज्य सरकारकडून संचारबंदी आणि जमावबंदी लावण्यात आली. तेव्हापासून व्यापाऱ्यांनी कामगारांना बोलवून आपल्या दुकानावर असलेल्या 10×10 आकाराच्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगितले. मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने व्यापारी, माथाडी कामगार, ट्रान्सपोर्टर व ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस नवी मुंबईत कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाटाने वाढत आहे. आता नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर येऊन पोहोचली आहे.

दुसरेकडे मुंबई एपीएमसीत सर्व बाजार सुरु करण्यासाठी पणन अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईची वाटचाल कोरोनाच्या हॉटस्पॉट होण्याकडे तर होत नाही ना अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. काही व्यपारी आपल्या स्वार्थासाठी मंत्र्यांकडे बाजार सुरु करण्यासाठी धावपळ करत आहेत, असाही आरोप होत आहे. यावेळी व्यापारी व प्रशासन फळे व भाजीपाला बाजार आवारात राहणाऱ्या कामगारांच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे.

भाजीपाला व फळ बाजाराची सध्याची परिस्थिती

भाजीपाला व फळ बाजारात प्रत्येक विंगमध्ये सध्या 8 ते 10 हजार परप्रांतीय कामगार वास्तव करतात. या पाचही मार्केटमध्ये दर दिवशी कमीत कमी 12 ते 15 हजार नागरिक खरेदी विक्रीसाठी ये-जा करतात. एकूण 25 ते 30 हजार लोकांचा येथे वावर होतो. सध्या आंब्याचा सिझन असल्यानं अजून गर्दी होणार आहे. बाजारात येणारे व्यापारी, ग्राहक कामगार मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली भागातून येतात. बाजारात कुठल्याही प्रकारचा सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नसल्याचं वेळोवेळी दिसत आहे. त्यामुळे बाजारात समूह संसर्ग होण्याची भीती काही व्यापारी व माथाडी कामगार व्यक्त करत आहेत.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 1756 30 112
पुणे (शहर+ग्रामीण) 320 19 34
पिंपरी चिंचवड 31 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 106 3
नवी मुंबई 63 3 3
कल्याण डोंबिवली 50 2
मीरा भाईंदर 49 2
वसई विरार 29 1 3
उल्हासनगर 1
भिवंडी 1
पालघर 5 1
रायगड 5
पनवेल 10 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 4
मालेगाव 42 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 27 3 1
धुळे 2 1
जळगाव 2 1
सोलापूर 1 1
सातारा 6 2
कोल्हापूर 6
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 23 5 1
जालना 1
हिंगोली 1
लातूर 8
उस्मानाबाद 4 1
बीड 1
अकोला 12
अमरावती 6 1
यवतमाळ 5 3
बुलडाणा 17 1 1
वाशिम 1
नागपूर 44 5 1
गोंदिया 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 11 2
एकूण 2684 229 178

संबंधित बातम्या :

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल : मुख्यमंत्री

Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

Increasing Corona Patient in Navi Mumbai APMC area

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/increasing-corona-patient-in-navi-mumbai-apmc-area-207390.html