मुंबई बातम्या

Corona : नवी मुंबईत एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोना, 11 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 50 वर – TV9 Marathi

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच (Navi Mumbai Corona Update) आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज दिवसभरात नवी मुंबईत 11 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 50 वर येऊन पोहोचली आहे.

नवी मुंबईतील बेलापूर गावात एका कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वाशीमध्ये 2, नेरुळ 2 आणि कोपरखैरणेमध्ये 1 नवीन कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या ही 50 वर पोहोचली आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार पार

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 2 हजारचा टप्पा ओलांडला (Maharashtra Corona Virus Update) आहे. राज्यात आज (13 एप्रिल) 82 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात मुंबई, पुणे, ठाणे, वसई विरारमधील कोरोना रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 982 वरुन 2 हजार 064 वर पोहोचला आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

  • मुंबई – 59
  • पुणे – 3
  • मालेगाव – 12
  • ठाणे – 5
  • वसई विरार – 1
  • पालघर – 2
  • नवी मुंबई -11

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1357 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली  (Maharashtra Corona Virus Update)आहे.

आतापर्यंतची अपडेट आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 1540 30 101
पुणे (शहर+ग्रामीण) 279 19 30
पिंपरी चिंचवड 29 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 59 3
नवी मुंबई 46 3 3
कल्याण डोंबिवली 50 2
मीरा भाईंदर 49 2
वसई विरार 26 1 3
उल्हासनगर 1
भिवंडी 1
पालघर 4 1
रायगड 5
पनवेल 9 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 4
मालेगाव 29 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 27 3
धुळे 2 1
जळगाव 2 1
सोलापूर 1 1
सातारा 6 2
कोल्हापूर 6
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 5 1
औरंगाबाद 23 5 1
जालना 1
हिंगोली 1
लातूर 8
उस्मानाबाद 4 1
बीड 1
अकोला 12
अमरावती 5 1
यवतमाळ 5 3
बुलडाणा 17 1 1
वाशिम 1
नागपूर 39 5 1
गोंदिया 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 9 1
एकूण 2334 229 160

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/navi-mumbai-corona-update-11-new-corona-patients-found-206746.html