मुंबई बातम्या

बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण; हॉस्पिटल सील करण्याची मागणी – Sakal

मुंबई : मुंबईतील सैफी, जसलोक वोकहार्ट नंतर आता आणखी एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय. मुंबईतील  बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झालीये.  चिंतेची बाब म्हणजे या डॉक्टरने अनेकांवर उपचार केल्याचं देखील समोर येतंय.

सदर डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडियोलॉजी विभागातील आहे. आपल्याच हॉस्पिटलमधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने अन्य डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार या डॉक्टरने अनेक रुग्ण त्याचसोबत अनेक गर्भवती महिलांना देखील तपासलंय. यानंतर पीडित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात यावी अशी आता रुग्णांच्या नातेवाईकांनी केलीये. 

मोठी बातमी – मोठी बातमी – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड क्वारंटाईनमध्ये…

बॉम्बे हॉस्पिटलमधील या कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरांना आता क्वारंटाईन करण्यात आलंय, मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य डॉक्टरांचं आणि रुग्णालयातल्या सेवकांचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल सील करण्याची मागणी इथल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतेय. 

मोठी बातमी – कोरोना झाल्यापासून ७ ते १० दिवसात शरीरात तयार होतात अँटीबॉडीज्; मात्र परत कोरोना होण्याचा धोका किती?

मुंबईत काल रात्री पर्यंत 221 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्या 1982 झाली आहे. १२ एप्रिल रोजी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे 16, पुणे 3, नवी मुंबईचे 2  आणि सोलापूरचा 1 आहे.  त्यामध्ये 13 पुरुष तर 9 महिला असून त्यापैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 15  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे. 

doctor from bombay hospital detected positive hospital staff demands sealing of hospital

Source: https://www.esakal.com/mumbai/doctor-bombay-hospital-detected-positive-hospital-staff-demands-sealing-hospital-280029