मुंबई बातम्या

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’ – TV9 Marathi

मुंबई : राज्यात कोरोनानं थैमान घातल्यानं एकत्र येऊन होणारा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा कसून प्रयत्न करत आहे. त्यात मुंबईसारख्या लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणाऱ्या शहरात नागरिकांना संसर्गापासून सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायला लावणं हे पोलिस यंत्रणांपुढील मोठं आव्हान आहे. त्यामुळेच यावर उपाय म्हणून मुंबई झोन 1 चे डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांनी ‘मास्क पहनो आणि सुरक्षित रहो’ हे अभियान सुरु केलं आहे. त्याअंतर्गत मुंबई पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांना थेट मुर्गा बनण्याची आणि नागिन डान्स करण्याची शिक्षा देण्यात येत आहे (Murga Abhiyan by Mumbai Police amid Corona).

मुंबई झोन 1 चे डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मुंबईतील भिंडी बाजार येथे ‘मास्क पहनो और सुरक्षित रहो’ अभियान सुरु करण्यात आलं आहे. या ठिकाणी नागरिकांना कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी घेण्याच्या सर्व खबरदारींची माहिती दिली जात आहे. ‘कोरोना से बचना है’ इसलिए मास्क लगाना है’ अशा अनेक घोषवाक्यांमधून जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकांना या कोरोनाविरोधातील लढ्यात सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे.

असं असलं तरी दुसरीकडे शिस्तभंग करत नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून आगळीवेगळी शिक्षाही दिली जात आहे. मुंबईत घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जो कुणी मास्क न घालता घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी दिसेल त्याला थेट अटक करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अटक करण्याऐवजी पोलिसांनी अशा बेजबाबदार नागरिकांना थेट मुर्गा करत नागिन डान्स करायला लावण्याची शिक्षा दिली आहे. या शिक्षेची सध्या मुंबईत जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता किमान या शिक्षेच्या भीतीने तरी नागरिक नियमांचं पालन करतात की नाही हे पाहावे लागणार आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 1008 30 64
पुणे (शहर+ग्रामीण) 229 19 25
पिंपरी चिंचवड 22
ठाणे (शहर+ग्रामीण) 34 3
कल्याण 34 2
नवी मुंबई 32 3 2
मीरा भाईंदर 21 1
वसई विरार 12 1 3
पनवेल 6 1 1
पालघर 3 1
सातारा 6 1
सांगली 26 4
नागपूर 27 5 1
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 25 3
बुलडाणा 13 1 1
औरंगाबाद 19 5 1
लातूर 8
अकोला 12
मालेगाव 5 1
रत्नागिरी 5 1
यवतमाळ 4 3
उस्मानाबाद 4 1
अमरावती 4 1
कोल्हापूर 6
उल्हासनगर 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 2
जळगाव 2 1
जालना 1
हिंगोली 1
वाशिम 1
गोंदिया 1
सिंधुदुर्ग 1
बीड 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 9
एकूण 1574 188 110

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

Murga Abhiyan by Mumbai Police amid Corona

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/murga-abhiyan-by-mumbai-police-amid-corona-virus-infection-in-mumbai-205797.html