मुंबई बातम्या

Corona | मुंबईतील डीसीपी रँक अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह – TV9 Marathi

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अनेक दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव (Mumbai DCP corona suspected) केल्यानंतर, आता डॉक्टर आणि काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणं (Mumbai DCP corona suspected) दिसू लागली आहे. मुंबईत एका पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे या अधिकाऱ्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने या अधिकाऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

या अधिकाऱ्याच्या घशातील नमुने/ स्वॅब चाचणीकरिता पाठवण्यात आले होते. त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना होती.

सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीस समाजरक्षणासाठी काटेकोर कर्तव्य बजावत असताना, त्यांनाही आता कोरोनाची लागण होत असल्याने, सध्यस्थितीचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, डीसीपी रँकच्या या अधिकाऱ्याला काल रुग्णालयात दाखल केल्यानंतर, काही प्राथमिक चाचण्या केल्या. त्यावेळी त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने, घशाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र आज त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खबरदारी म्हणून या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील 12 पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार

मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वरळी कोळीवाडा आणि धारावीनंतर आता पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानंतर पवई झोपडपट्टीतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे. (Corona Patient in Powai Slums)

पवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण झोपडपट्टीच सील करण्यात आली आहे. इथे संचार करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. पंचशीलनगरमध्ये क्वारंटाईन झोन करण्यात आला आहे.

मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा काल ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-dcp-rank-police-officer-suspected-corona-positive-report-awaited-202600.html