मुंबई बातम्या

Corona | मुंबईत 16 नवे कोरोनाग्रस्त, पुण्यातही बेरीज सुरुच, महाराष्ट्रातील आकडा 320 वर – TV9 Marathi

मुंबई : महाराष्ट्रातील ‘कोरोनाग्रस्तांचा’ आकडा वाढतानाच दिसत आहे. 18 रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. मुंबईत 16, तर पुण्यात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. (Corona Patients Updates in Maharashtra)

‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबई आणि पालघरमध्ये प्रत्येकी एका ‘कोरोनाग्रस्त’ रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईतील हा आठवा बळी आहे. मुंबईत 75 वर्षीय वृद्धाचा ‘कोरोना’मुळे बळी गेल्याची माहिती आहे, तर पालघरमध्येही 50 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू झाला. मुंबईत 8, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कालच्या (मंगळवार 31 मार्च) दिवसभरात राज्यात 72 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण होते. मुंबईतील कालचे आणि आतापर्यंतचे आकडे पाहता काही तासातच 75 रुग्णांची भर पडल्याचं चित्र आहे. मुंबईत आता 167 कोरोनाग्रस्त असून पुण्यात 38 कोरोनाबाधित आहेत.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 167
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 9
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 9
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 3
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 320

(Corona Patients Updates in Maharashtra)

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 1 एप्रिल
पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 167 14 8
पुणे (शहर+ग्रामीण) 38 7 1
पिंपरी चिंचवड 12 9
सांगली 25
नागपूर 16 4
कल्याण-डोंबिवली 9
नवी मुंबई* 8 1
अहमदनगर 8 1
ठाणे* 9
वसई-विरार* 6
यवतमाळ 4 3
बुलडाणा 3 1
सातारा 2
पनवेल* 2
कोल्हापूर 2
उल्हासनगर * 1
गोंदिया 1
औरंगाबाद 1 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
पालघर 1 1
रत्नागिरी 1
जळगाव 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 320 39 12

(Corona Patients Updates in Maharashtra)

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/corona-patients-updates-in-maharashtra-201423.html