मुंबई बातम्या

मुंबईत 65 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू, मालवणी परिसर बीएमसी-पोलिसांकडून सील – TV9 Marathi

मुंबई : ‘कोरोना’मुळे मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचा राहता परिसर सील करण्यात आला आहे. मालवणी भागात कादरी मशीद परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय रुग्णाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात उपचार सुरु असताना काल रात्री (31 मार्च) त्याची प्राणज्योत मालवली. (Malvani Area Sealed after Mumbai Corona Patient Death)

‘कोरोना’ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबीयांना ‘कोरोना’ चाचणीसाठी नेण्यात आले आहे. बीएमसी आणि पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबईतील हा आठवा बळी आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 320 पार गेला आहे. मुंबईत 8, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. पालघरमध्येही 50 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू झाल्याचं आजच समोर आलं होतं.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

ही बातमी वाचलीत का? :

(Malvani Area Sealed after Mumbai Corona Patient Death)

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 167
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 9
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 9
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 3
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 320

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 181 14 12
पुणे (शहर+ग्रामीण) 38 9 1
पिंपरी चिंचवड 12 10
सांगली 25
नागपूर 16 4
कल्याण-डोंबिवली 10
नवी मुंबई* 8 1
अहमदनगर 8 1
ठाणे* 8
वसई-विरार* 6
यवतमाळ 4 3
बुलडाणा 4 1
सातारा 2
पनवेल* 2
कोल्हापूर 2
उल्हासनगर * 1
गोंदिया 1
औरंगाबाद 1 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
पालघर 1 1
रत्नागिरी 1
जळगाव 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 335 41 16

Malvani Area Sealed after Mumbai Corona Patient Death

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/malvani-area-sealed-after-mumbai-65-years-old-corona-patient-death-201640.html