मुंबई : ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबई आणि पालघरमध्ये प्रत्येकी एका ‘कोरोनाग्रस्त’ रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईतील हा आठवा बळी आहे. (Corona Patient Death in Maharashtra)
मुंबईत 75 वर्षीय वृद्धाचा ‘कोरोना’मुळे बळी गेल्याची माहिती आहे, तर पालघरमध्येही 50 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू झाला. राज्यातील वाढलेली आकडेवारी धक्कादायक असून लॉकडाऊन न पाळणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार गेला आहे. कालच्या (मंगळवार 31 मार्च) दिवसभरात 72 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण आहेत, तर पुण्याचे 2, अहमदनगरचे 3, ठाण्याचे 2, कल्याण-डोंबिवलीचे 2, नवी मुंबईचे 2, तर वसई विरारचेही 2 रुग्ण आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 151 वर पोहोचली आहे. तर राज्यातील संख्या ही 302 वर पोहोचली आहे.
राज्यात आतापर्यंत बारा जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईत 8, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?
मुंबई – 151
पुणे – 36
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 16
कल्याण – 9
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 9
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 3
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1
एकूण 302
(Corona Patient Death in Maharashtra)
Maharashtra: 16 more persons have tested positive for #COVID19 in Mumbai and two more cases have been reported in Pune, taking the total number of cases in the state to 320. Total 12 people have died due to #COVID19 in the state till now. pic.twitter.com/IKzSV4YRy0
— ANI (@ANI) April 1, 2020
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 1 एप्रिल
पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 167 | 14 | 8 |
पुणे (शहर+ग्रामीण) | 38 | 7 | 1 |
पिंपरी चिंचवड | 12 | 9 | |
सांगली | 25 | ||
नागपूर | 16 | 4 | |
कल्याण-डोंबिवली | 9 | ||
नवी मुंबई* | 8 | 1 | |
अहमदनगर | 8 | 1 | |
ठाणे* | 9 | ||
वसई-विरार* | 6 | ||
यवतमाळ | 4 | 3 | |
बुलडाणा | 3 | 1 | |
सातारा | 2 | ||
पनवेल* | 2 | ||
कोल्हापूर | 2 | ||
उल्हासनगर * | 1 | ||
गोंदिया | 1 | ||
औरंगाबाद | 1 | 1 | |
सिंधुदुर्ग | 1 | ||
नाशिक | 1 | ||
पालघर | 1 | 1 | |
रत्नागिरी | 1 | ||
जळगाव | 1 | ||
इतर राज्य (गुजरात) | 1 | ||
एकूण | 320 | 39 | 12 |
Corona Patient Death in Maharashtra
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/mumbai/corona-patient-death-in-maharashtra-one-dies-in-palghar-another-death-in-mumbai-201414.html