मुंबई बातम्या

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर, मुंबई शंभरीच्या उंबरठ्यावर, धाकधूक वाढली – TV9 Marathi

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर पोहोचला (Rise in Maharashtra Corona Patients) आहे. मुंबईत 5, पुणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी 3 नवे रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई, डोंबिवली आणि बुलडाण्यात प्रत्येकी दोन रुग्णांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आज (31 मार्च) दिवसभरात राज्यात 17 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची धाकधूक अजून वाढली आहे.

अहमदनगरमधील जामखेड शहरात आणखी तीन जणांना कोरोनाची (Rise in Maharashtra Corona Patients) लागण झाली आहे. यापूर्वी आढळलेल्या दोन परदेशी नागरिकांच्या संपर्कात हे तिघे जण आले होते. अहमदनगरमध्ये काल 29 जणांचे सॅपल पाठवले होते. यातील 26 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 झाली आहे. दरम्यान यातील एका रुग्णाल डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर दुसरीकडे डोंबिवली परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आज डोंबिवलीतील एका महिलेचा आणि एका पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही 19 मार्चला झालेल्या राजकील लग्न सभारंभात सहभागी झाले होते. या दोघांवर मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 220 वरुन 237 वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत दहा जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईत 7, नवी मुंबई, पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला (Rise in Maharashtra Corona Patients) आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 97
पुणे – 34
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 9
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 5
वसई विरार – 4
यवतमाळ – 4
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
बुलडाणा – 3
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 239

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 97 14 7
सांगली 25
पुणे (शहर+ग्रामीण) 34 7 1
पिंपरी चिंचवड 12 9
नागपूर 16 4
कल्याण-डोंबिवली 9
नवी मुंबई* 8 1
अहमदनगर 8 1
ठाणे* 5
वसई-विरार* 4
यवतमाळ 4 3
सातारा 2
पनवेल* 2
उल्हासनगर * 1
कोल्हापूर 2
गोंदिया 1
औरंगाबाद 1 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
पालघर 1
रत्नागिरी 1
बुलडाणा 3 1
जळगाव 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 239 39 10

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/rise-in-maharashtra-corona-patients-97-corona-virus-patient-in-mumbai-201126.html