मुंबई बातम्या

Corona | कोरोनाची धास्ती! मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये – TV9 Marathi

मुंबई : कोरोनाची दहशत सध्या इतक्या मोठ्या (Corona Dog Home Quarantine) प्रमाणात पसरली आहे की मुंबईत एका कुत्र्याला कोरोनाच्या धास्तीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मानखुर्द येथील देवनार कॉलनीत हा प्रकार उघडकीस (Corona Dog Home Quarantine) आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मानखुर्द येथील देवनार कॉलनीतील एका महिलेचा मृत्यू झाला. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर या महिलेच्या घराच्या शेजारील 5 ते 6 घरांना क्वारंटाईन करण्यात आलं.

यामध्ये एका कुटुंबातील कुत्र्याचाही समावेश आहे. या कुत्र्याला घरातील लोकांनी बंद करुन ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या कुत्र्याला पूर्णपणे सॅनिटाईझ केलं. त्यानंतर त्याला होम क्वारंटाईनसाठी डॉग स्कॉटकडे देण्यात आलं. या कुत्र्यालाही 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना  दिसत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 147 वरुन 156 वर पोहोचली आहे. आज (27 मार्च) मुंबईत 9 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 6 जण हे मुंबईतील असून इतर 3 जण हे मुंबईबाहेरील आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईत नव्याने आढळलेले 5 कोरोनाबाधित रुग्ण हे युएसमधून (Mumbai Corona Positive case) आलेले आहे. तर इतर चार जण त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या 86 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 58
सांगली – 24
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 13
नागपूर – 9
कल्याण – 6
नवी मुंबई – 6
ठाणे – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
पनवेल – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
पालघर – 1
रत्नागिरी – 1
गुजरात – 1
एकूण 156

Corona Dog Home Quarantine

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबई (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 19 मार्च
उल्हासनगर (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च
अहमदनगर (1) – 24 मार्च
सांगली (5) – 25 मार्च
मुंबई (9) – 25 मार्च
ठाणे (1) – 25 मार्च
मुंबई (1) – 26 मार्च
ठाणे (1) – 26 मार्च
नागपूर (1) – 26 मार्च
सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च
सांगली (3) – 26 मार्च
पुणे (1) – 26 मार्च
कोल्हापूर (1) – 26 मार्च
नागपूर (4) – 27 मार्च
गोंदिया (1) – 27 मार्च
सांगली (12) – 27 मार्च
मुंबई (6) – 27 मार्च
मुंबई उपनगर (3) – 27 मार्च

एकूण – 156 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च
गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च

  • देशात मृत्यूचा आकडा : 20
  • महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा : 05
  • देशात कोरानाबाधित रुग्ण : 727
  • राज्यात कोरोना बाधित रुग्ण : 156
  • जगात मृत्युचा आकडा : 24,089

Corona Dog Home Quarantine

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 51 12 4
पुणे 19 5
पिंपरी चिंचवड 13
सांगली 24
कल्याण 6
नवी मुंबई 6 1
नागपूर 9 1
यवतमाळ 4
अहमदनगर 3
ठाणे 5
सातारा 2
पनवेल 2
उल्हासनगर 1
वसई-विरार 1
औरंगाबाद 1 1
रत्नागिरी 1
सिंधुदुर्ग 1
कोल्हापूर 1
पालघर 1
गोंदिया 1
गुजरात 1
एकूण 156 19 5

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/headlines/corona-dog-home-quarantine-at-mumbai-199561.html