मुंबई बातम्या

मुंबई-ठाण्यात दोन रुग्ण सापडले; प्रभादेवीत फेरीवाल्या महिलेला करोना? – Maharashtra Times

मुंबई-ठाण्यात दोन रुग्ण सापडले; प्रभादेवीत फेरीवाल्या महिलेला करोना?
मुंबई: राज्यात लॉकडाऊन केल्यानंतरही करोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाही. आज पुन्हा मुंबई आणि ठाण्यात दोन करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १२४वर पोहोचला आहे. आज सापडलेल्या दोन रुग्णांपैकी प्रभादेवी येथील एका खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्या महिलेलाही करोनाची बाधा झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

प्रभादेवी येथील एका कार्पोरेट ऑफिसच्या खाली या महिलेचा खाद्यपदार्थांचा ठेला आहे. या ठिकाणी कार्पोरेट कंपनीतील अनेक लोक खाद्यपदार्थ खाण्यासाठी येतात. त्यामुळे संपर्कातून या महिलेला करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. या महिलेला ताप आल्यावर घशात खवखव जाणवू लागल्याने तिची करोना टेस्ट करण्यात आली असता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Live: पुण्यात ४८ तासांत एकही रुग्ण नाही!

‘बहुतांश जणांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे शक्य’

दरम्यान, मुंबई आणि ठाण्यात आणखी दोन करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२४वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांत पुण्यात एकही करोना रुग्ण आढळला नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

करोना व्हायरस: रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

राज्यातील करोना रुग्ण

मुंबई शहर आणि उपनगर – ५२

पिंपरी चिंचवड मनपा – १२

पुणे मनपा – १९

नवी मुंबई – ५

कल्याण – ५

नागपूर – ४

यवतमाळ – ४

सांगली – ९

अहमदनगर – ३

ठाणे – ४

सातारा – २

पनवेल- १

उल्हासनगर – १

औरंगाबाद – १

रत्नागिरी – १

वसई-विरार – १

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/2-new-positive-cases-of-coronavirus-in-mumbai-and-thane/articleshow/74822109.cms