मुंबई बातम्या

द बॉम्बे कॅन्टीनच्या शेफचा कोरोनाने मृत्यू – मुंबई लाइव्ह

प्रसिद्ध शेफ कार्डोज़ (Floyd Cardoz) यांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला. 59 वर्षांचे कार्डोज़ अमेरिकाच्या न्यूयॉर्क शहरात जाऊन आले होते. तिथंच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हंटलं जात आहे. ते मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट बॉम्बे कॅन्टीन आणि ओ पेड्रो चे भागीदार होते. त्यांनी नुकतचं बॉम्बे स्वीट शॉप नावाचं दुकान सुरू केलं होतं.

कार्डोज़ यांचा जन्म मुंबईच झाला होता. 8 मार्चपर्यंत ते मुंबईत होते. 1 मार्च रोजी आपल्या रेस्टॉरंटच्या 15 व्या ऍनिवर्सरीत सहभागी झाले होते. या पार्टीला किमान 200 जण उपस्थित होते.

त्यानंतर कार्डोज यांनी द बॉम्बे स्वीट शॉपचं उद्घाटन देखील केलं. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. तिथं न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून 18 मार्चला दिली होती. 

Source: https://www.mumbailive.com/mr/civic/floyd-cardoz-celebrity-chef-and-culinary-director-of-mumbai-restaurant-the-bombay-canteen-dies-due-to-coronavirus-in-new-york-47256