मुंबई बातम्या

मुंबईत जमावबंदीचं उल्लंघन, हॉटेल, पान टपरी, फेरीवाले, 24 तासात 112 गुन्हे दाखल – TV9 Marathi

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्तांनी  जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र, मुंबईत या जमावबंदीच्या आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर आता मुंबई पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे (FIR against citizens in Mumbai amid Corona). गेल्या 24 तासात जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 112 गुन्हे नोंदवले आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत.

  1. कोरोना व्हायरसबाबत गैरसमज पसरवणे – 3 गुन्हे दाखल
  2. हॉटेल सुरू ठेवणे – 16 गुन्हे दाखल
  3. पान टपरी सुरू ठेवणे – 6 गुन्हे दाखल
  4. इतर दुकान सुरू ठेवणे – 53 गुन्हे दाखल
  5. हॉकर्स, फेरीवाले – 18  गुन्हे दाखल
  6. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे – 10 गुन्हे दाखल
  7. अवैध वाहतूक करणे – 6 गुन्हे दाखल

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 188 नुसार ही कारवाई केली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही गंभीर पाऊलं उचलत आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासोबतच हा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वेगळं ठेवणं हेही मोठं आव्हान आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडण्यास मज्जाव करत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या किती?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 40
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
कल्याण – 5
सांगली – 4
नागपूर – 4
यवतमाळ – 4
नवी मुंबई – 3
अहमदनगर – 2
सातारा – 2
ठाणे -2
पनवेल – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
उल्हासनगर – 1

एकूण 101

(Corona Patients in Maharashtra above hundred)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च

एकूण – 101 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिकाचा मृत्यू (1) – 23 मार्च
एकूण – 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र लॉकडाऊन, संचारबंदी लागू, आजपासून कोणकोणते बदल?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, पुण्यात आणखी 3 रुग्ण

#Fake News Alert : संचारबंदीत दूध-किराणा खरेदीबाबत ‘तो’ व्हायरल मेसेज खोटा

‘कोरोना’ला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी, भाजी खरेदीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर

सकाळी 7 ते 11 भाजी मार्केट सुरु, एकट्यानेच जा, संचारबंदी मोडणाऱ्यांना अजित पवारांची तंबी

FIR against citizens in Mumbai amid Corona

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/many-fir-filled-against-citizens-in-mumbai-amid-corona-virus-restriction-198040.html