मुंबई बातम्या

करोना: नागपाडा येथील ‘मुंबई बाग’ आंदोलन अखेर स्थगित – Maharashtra Times

करोना: नागपाडा येथील ‘मुंबई बाग’ आंदोलन अखेर स्थगित
मुंबई: दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा येथे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात सुरू असलेले ‘मुंबई बाग’ आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. हे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तसे आंदोलकांना सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र उद्यापासून लॉकडाऊन; सर्वत्र जमावबंदी

करोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे लागू करण्यात आलेला जमावबंदी आदेश आणि काही डॉक्टरांनी गर्दीमुळे प्रार्दुभाव पसरण्याची शक्यता पटवून सांगितल्याने आंदोलक महिलांनी आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्याची तयारी दर्शविली. हे आंदोलन आता स्थगित झाले आहे.

महाराष्ट्र लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद असेल?

मुंबई बाग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणारे वृद्ध नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना आधीच आंदोलनापासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हे आंदोलन स्थगित व्हावे, यासाठी सरकारी यंत्रणांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन व जमावबंदीचा आदेश जारी केल्यानंतर नव्याने आंदोलकांची समजूत घालण्यात आली. या प्रयत्नांना यश आलं असून आंदोलन तूर्त स्थगित करण्यावर आंदोलक राजी होऊन तातडीने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मुंबई : बंदोबस्तावरील पोलीसच करोना संशयित

दरम्यान, दिल्लीत शाहीन बाग आंदोलन सुरूच असून आज जनता कर्फ्यूदरम्यान केवळ पाच जणांनाच धरणे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर आंदोलक त्यासाठी राजी झाले.

करोना: वीज ग्राहकांना सरासरी बिल- ऊर्जामंत्री

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-updates-mumbai-bagh-protests-in-nagpada-was-finally-stopped/articleshow/74764313.cms