मुंबई बातम्या

Coronavirus in Mumbai Live Updates: चर्चमधील जमावाविरुद्ध महिला न्यायालयात – Maharashtra Times

Coronavirus in Mumbai Live Updates: चर्चमधील जमावाविरुद्ध महिला न्यायालयात
मुंबई: मुंबई शहरात एकाचा बळी घेणारा खतरनाक करोना व्हायरस हळूहळू पसरू लागल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईत आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळं चिंता वाढली आहे. मुंबईतील काही भागांत दिवसाआड दुकानं बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या संपूर्ण घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स:

लाइव्ह अपडेट्स:

>> ट्रान्स हार्बरवरील एसी लोकल देखील उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

>> पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल आजपासून बंद, गैरसोय टाळण्यासाठी सर्वसामान्य लोकल चालवण्यात येणार

>> मुंबईहून बडोद्याला जाणाऱ्या प्रवाशांना बोरीवली स्थानकावर उतरवले, सिंगापूरहून आलेल्या या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के असल्याची माहिती

>> करोनाचा धोका असतानाही चर्चमध्ये लोक जमत असल्याची वकील महिलेची तक्रार; मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी

>> करोनाशी लढण्यासाठी सरकार सज्ज. नागरिकांनी सूचना पाळाव्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

image

>> मक्केच्या यात्रेवर गेलेल्या ३०३५ भारतीय यात्रेकरूंच्या अखेरच्या तुकडीला आणण्यास सुरुवात… पाहिले विमान काही वेळापूर्वीच मुंबईत पोहोचले

>> मुंबईतील डबेवाल्यांची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद, १ एप्रिलपासून पुन्हा सेवा नियमित सुरू होणार

बेस्ट बसमधून उभ्याने प्रवास न करण्याचं बेस्ट उपक्रमाचं मुंबईकरांना आवाहन

वाचा:
करोनाने नौदल सतर्क; मुंबईच्या समुद्रात नौकांची गस्त

>> वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वच्छता मोहीम, आज बाजारपेठ बंद राहणार

वाचा:
तरुणीच्या करोना चाचणीस ‘कस्तुरबा’त नकार

वाचा:
मुंबईत शटडाऊन नाही; तूर्त ५०-५० फॉर्म्युला

>> मुंबईत आणखी एक करोनाग्रस्त सापडल्यानं एकूण रुग्णांची संख्या आठवर

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-live-updates-in-mumbai-on-19-march-2020/articleshow/74702486.cms