उल्हासनगरमध्ये एका ४९ वर्षीय महिलेला करोना रुग्णाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. ही महिला दुबईहून प्रवास करून आली होती. विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली असता या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय मुंबईतील एका २२ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे. ही तरुणी ब्रिटनमधून आली होती. त्यामुळे तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७वर पोहोचली असून देशातील करोना रुग्णांची संख्या १७१वर पोहोचली आहे.

गर्दीमुळे मुंबईत ‘या’ भागांत दुकाने दिवसाआड बंद
दरम्यान, मक्केला यात्रेसाठी गेलेले ३०३५ यात्रेकरू करोनामुळे अडकून पडले होते. त्यातील अखेरच्या तुकडीला भारतात आणण्यात येत असून या तुकडीला आणणाऱ्या पहिल्या विमानाने जेद्दाहून उड्डाण घेतले होते. थोड्यावेळापूर्वीच हे विमान मुंबईत दाखल झाले आहे. विशेष विमानाने आलेल्या या सर्व प्रवाशांची करोना टेस्ट होणार असून त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे प्रवासी तूर्तास कुणाच्याही संपर्कात येऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

ठाणे: करोनाचा शिक्का; चौघांना ट्रेनमधून उतरवले
करोना: नावं फोडली; मनसे उपाध्यक्षावर गुन्हा
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/two-more-tested-positive-for-coronavirus-in-mumbai-and-ulhasnagar/articleshow/74704323.cms